हृदयस्पर्शी! लेकीला दिलेला तो शब्द पूर्ण न करताच जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन; वाचून अश्रू होतील अनावर..

बॉडीबिल्डिंग क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी एक दुःखद घटना घडली आहे. जगदीश लाड या देश पातळीवर नावाजलेल्या खेळाडूचे कोरोनाने निधन झाले. यामुळे शरीर मजबूत असले तरी कोरोना कोणाला सोडत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील पुंडल ह्या गावात जगदीश ह्यांचा जन्म झाला होता. फिजिकल फिटनेसची आवड असल्याने तो बॉडीबिल्डिंगकडे वळला. मिस्टर युनिव्हर्स प्रेमचंद यांना तो आदर्श मानायचा.

कामानिमित्त तो गुजरातमध्ये राहत होता. कोरोना झाल्यानंतर तो रुग्णालयात होता. तेथून तो आपल्या पत्नीसोबत आणि मुलीसोबत रुग्णालयातून गप्पा मारत होता. त्यांची चिमुरडी त्यांची सतत आठवण काढत रडत होती. तुम्ही चिंता करू नका, मी लवकरच घरी येणार आहे. घरी आल्यावर आपण सोबत खेळू आणि खूप खूप मज्जा करू, असे जगदीश ह्यांनी आपल्या मुलीला वचन दिले होते.

शुक्रवारी मात्र अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. आपल्या लाडक्या मुलीला दिलेला शब्द पूर्ण न करताच जगदीश लाड ह्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसला आहे.

पत्नीला एकटीला आपल्या पतीचे अंत्यविधी करावे लागले. बडोद्याला आणि आसपास त्यांच्या कोणी परिचयाचे नाही, त्यामुळे ह्या दुःखात आपल्या छोट्या मुलीसोबत त्या एकट्याच पडल्या आहेत. यामुळे त्यांनी आपल्या मुलीला दिलेला शब्द मोडला, आणि जगाचा निरोप घेतला.

अचानक त्याचे निधन झाल्याची वार्ता समोर आल्यामुळे महाराष्ट्रातल्या त्यांच्या सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला. उपजीविकेसाठी फिजिकल ट्रेनर म्हणून, जगदीशने बॉडीबिल्‍डिंगसोबत काम करत असे. दोन वर्षांपूर्वी एका जिमचा व्यवस्थापक म्हणून तो पत्नी आणि लेकीसह गुजरातच्या अहमदाबादला राहत होता.

ताज्या बातम्या

भारतनाना माफ करा! तुमच्या सेवेला पैशाने हरविले, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंनी घेतली चांगली मत;पण पाहावे लागले पराभवाचे तोंड

IPL विजेता कर्णधार वाॅर्नरवर आली वाॅटरबाॅय बनण्याची वेळ; भर मैदानात ढसाढसा रडला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.