“ब्लॅकनं औषधं पण आणली, बेडसाठी ३ दिवस शहरभर फिरलो पण कुणालाच वाचवता आलं नाही”

 

 

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने खुप धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्युचे प्रमाणही वाढत चालले आहे. आता कोरोनामुळे अवघ्या १५ दिवसांत पुर्ण कुटुंब उदध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यात राहत असलेले हे कुटुंब होते जाधव कुटुंब. एक महिन्यापुर्वी सर्व ठिक होते. आज मात्र या कुटुंबाच्या आठवणीच राहिल्या आहे. जाधव कुटुंबातील चौघाजणांचा गेल्या १५ दिवसांत मृत्यु झाला आहे.

अरुण गायकवाड यांची पत्नी वैशाली गायकवाड, वैशालीचे दोन भाऊ आणि आई अशा चौघांचा गेल्या पंधरा दिवसांत मृत्यु झाला आहे, असे अरुण गायकवाड यांनी सांगितले आहे.

वैशाली यांच्या वडिलांचा मृत्यु १५ जानेवारीला झाला होता. त्यानंतर पुजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आले होते. त्यानंतरच एकानंतर एक कोरोना पॉझिटिव्ह येण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदा धाकटा भाऊ रोहित (३८) पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सगळेच पॉझिटिव्ह आले.

त्यानंतर प्रचंड धावपळ सुरु झाली. रोहित यांना बाणेरच्या रुग्णालयात दाखल केले. दुसरा भाऊ अतुलला (४०) कोथरुडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. वैशालींची आई अलका यांना विश्रांतवाडीच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर २८ तारखेला वैशाली यांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला.

तेव्हा अरुण गायकवाड यांची खुप धावपळ केली. पहिल्यांदा गेले भारती रुग्णालयात बेड मिळाला नाही. त्यानंतर त्यांना शिवापुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिर होतेय असे वाटत असतानाच ३० मार्चला वैशाली यांचा मृत्यु झाला.

त्यानंतर अरुण गायकवाड यांच्या आईला आणि मुलांनाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर घरात सगळेच पॉझिटिव्ह आल्याने अरुण यांना एकट्यानेच धावपळ करावी लागत होती. मेव्हण्यासाठी तीन दिवस फिरलो, ब्लॅकने औषधे मिळवली पण काहीच उपयोग झाला नाही, असे अरुण गायकवाड यांनी म्हटले आहे.

३ एप्रिलला रोहितचा मृत्यु झाला. ४ एप्रिलला त्यांची आई अलका यांचा मृत्यु झाला, तर १४ एप्रिलला ४० वर्षांच्या अतुलचा मृत्यु झाला. या कोरोनाच्या संकटात फक्त १५ दिवसांत पुर्ण जाधव कुटुंब उदध्वस्त झाले आहे. आता या कुटुंबात रोहित आणि अतुल यांच्या पत्नी आणि मुलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

नवी मुंबईत बोगस कोरोना रिपोर्ट बनवणाऱ्या दोन लॅबचा पर्दाफाश, आरोपींना अटक

‘शिवाजी द बॉस’ चित्रपटातील सुपरस्टार अभिनेते विवेक यांचे निधन

आता सोशल डिस्टन्स पुरेस नाही, कोरोना हवेतूनही पसरतो, लॅन्सेटच्या अहवालामुळे खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.