एकट्या जडेजाने अख्खी आरसीबी धू धू धूतली; बॅटने तर धुतलीच पण बाॅलने सुद्धा सोडली नाही

मुंबई । जोरदार फलंदाजीनंतर गोलंदाजीतही रविंद्र जाडेजाने केलेल्या धमाकेदार खेळीच्या बळावर चेन्नईने बंगळुरुवर ६९ धावांनी विजय मिळवला. चेन्नईने हा सामना जिंकत गुणतालिकेत सरशी साधत पहिला नंबर मिळवला आहे.

सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची जबरदस्त सुरूवात झाली. फाफ आणि गायकवाड यांनी धमाकेदार सुरूवात करून दिली. गायकवाड बाद झाला त्यानंतर आलेल्या रैनानेही आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने ३ षटकार आणि चौकार मारत २४ धावा केल्या. पटेलने त्याला बाद केलं त्यानंतर फाफलाही पटेलने बाद करत चेन्नईला बॅकफूटवर ढकलले.

त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात चेन्नई अपयशी ठरते की काय असे वाटत असताना जडेजाने जोरदार फलंदाजी केली. विजयासाठी दिलेल्या १९१ धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरुची सुरुवात चांगली झाली नाही.

पडिक्कलने फटकेबाजी करत आशेचा किरण दाखवला. मात्र विराट कोहली ८ धावा करत बाद झाला. यानंतरही वॉशिंग्टन सुंदरही चांगली कामगिरी करु शकला नाही. ७ धावा करून तो बाद झाला.

तिसऱ्या षटकात एबी डिव्हिलियर्स ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर पडिक्कल देखील बाद झाला. त्याने ३४ धावांची खेळी केली. बंगळुरुच्या अपेक्षा असलेला मॅक्सवेलही लवकर बाद झाला. त्याने २२ धावा केल्या. जेमिसनने १६ धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून जाडेजाने ३ ताहिरने २ तर सॅम करन, शार्दुल ठाकूरने एक एक विकेट घेतली.

बंगळुरला १२२ धावांचीच मजल मारता आली. या सामन्यात रवींद्र जडेजा हिरो ठरला. त्याने तुफान फटकेबाजी केली. यामुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली. या जोरदार चेन्नईने हा सामना आरामात जिंकला. तसेच क्रमवारीत पहिला नंबर देखील मिळवला.

ताज्या बातम्या

कोरोनाने मुलाला हिरावले; ही वेळ दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून आईवडीलांनी तोडली १५ लाखांची एफडी

बाॅलीवूड पुन्हा हादरले! पद्मभूषण विजेत्या बड्या संगीतकाराचे कोरोनाने निधन

मोठा निर्णय! ठाकरे सरकार राज्यातील नागरीकांना देणार मोफत लस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.