जॅकलीनचा हा स्टंट पाहीला का? पाहून तुम्हालाही पडेल भुरळ

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल जाणून घेण्यात लोकांना खुप जास्त रुची आहे. कलाकार रोज कसे जीवन जगतात? काय करतात? दिवसभरातील त्यांचे सर्व काम जाणून घेणे त्यांच्या चाहत्यांना खुप आवडते. कलाकार देखील त्यांच्या चाहत्यांसोबत या गोष्टी शेअर करत असतात.

त्यामूळे कलाकार देखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. वैयक्तिक आयूष्यासोबतच कलाकार त्यांच्या आरोग्याविषयी देखील नेहमीच चाहत्यांना सांगत असतात. अभिनेत्री जॅकलीन फर्नाडिसने देखील तिच्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे.

 

जॅकलीनने तिच्या इंस्टाग्राम आकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जॅकलीन स्टंट करताना दिसत आहे. पांढऱ्या कलरच्या ड्रेसमध्ये जॅकलीन खुपच मनमोहक दिसत आहे. फोटो शेअर करत जॅकलीनने ‘टॉप टू बॉटम’ असे लिहीले आहे.

जॅकलीनच्या या फोटो तिच्या चाहत्यांनी खुपच पसंत केले आहे. फोटो शेअर केल्यानंतर काही मिनीटांमध्येच तिच्या फोटोला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. जॅकलीनला इंस्टाग्रामवर ४८ मिलीयन फॉलोवर्स आहेत. जॅकली सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.