एकेकाळी ८०० रुपयांवर काम करणारे जॅक मा, कसे बनले चीनचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती?

 

जगभरातल्या प्रसिद्ध ऑनलाईन कंपनीत चीनी कंपनी अलिबाबाचे नाव आहे. या कंपनीचे संस्थापक जॅक मा आजजरी चीनच्या श्रीमंत लोकांच्या यादीत असले तरी एकेकाळी ते सामान्य माणसाचे जीवन जगायचे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष हा प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.

जॅक मा यांचे पुर्ण नाव मा युन असे आहे. १५ ऑक्टोबर १९६४ मध्ये चीनच्या एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे आई-वडिल एक ड्रम आर्टिस्ट होते.

९ वर्षाचे असतानाच जॅक मा यांनी टुरीस्ट गाईड म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. ते टुरिस्ट म्हणून येणाऱ्या लोकांकडून इंग्लिश शिकायचे आणि त्याबदल्यात जॅक त्यांचे गाईड बनायचे. तिथुनच त्यांना इंग्रजी शिकायला मिळाले. जॅक मा हे नाव सुद्धा त्यांना एका टुरिस्टनेच दिले होते.

जॅक यांना नोकरी मिळवण्यासाठी खुप धावपळ करावी लागली होती. त्यांना अनेक कंपन्यानी नोकरी देण्यास नकार दिला होता. त्या कंपन्यांमध्ये प्रसिद्ध कंपनी केएफसी सुद्धा आहे. पण आता त्यांची संपत्ती केएफसी कंपनीपेक्षा जास्त आहे.

अनेकदा नोकरीसाठी त्यांना नकार मिळाला होता पण त्यांनी हार मानली नव्हती शेवटी त्यांना शिक्षक म्हणून एका ठिकाणी नोकरी मिळाली. तेव्हा त्यांना शिक्षक म्हणून १२ डॉलर म्हणजेच ८६० रुपये मिळायचे.

खुप वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. अशात १९९५ मध्ये ते अमेरिकेत गेले होते, तेव्हा पहिल्यांदा त्यांना इंटरनेटचे महत्व कळाले, तिथुनच त्यांनी एक कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तब्बल ४ वर्षे संघर्ष केला आणि १९९९ मध्ये १७ लोकांना घेऊन अलिबाबा ही कंपनी सुरु केली.

त्याने ही वेबसाईट यामुळे सुरु केली होती, ज्यामुळे छोट्या उद्योजकांना त्यांचे प्रॉडक्ट विकण्यास मदत होईल. त्यांचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. आज अलिबाबा ही कंपनी इतकी प्रसिद्ध झाली आहे, की जगात अलिबाबा तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑनलाईन सेलर कंपनी आहे.

आज जॅक मा यांची अलिबाबा गृप क्लाऊड कम्प्युटींग, डिजीटल मीडिया, मनोरंजन आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे. आयुष्यात अनेक संकटाना मात देऊन जॅक मा यांनी इतकी उंची गाठली आहे. त्यांचा हा जीवनातील संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.