साथ असावी तर अशी; आजी आजोबांचा हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

माणूस या धावपळीच्या जीवनात अनेक सुखांकडे दुर्लक्ष करत असतो. त्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर कोणतीना कोणती गोष्ट अचीव करायची असते. या सगळ्या गोष्टींमुळे तो आपल्या जवळच्या माणसांकडे दुर्लक्ष करतो.

या सगळ्यांमध्ये प्रगतीच्या वाटेवर साथ देणारी आणि अनेक दुखांत वाटेकरी होणारी व्यक्ती म्हणजे बायको. आई-वडील मुलांचा हात तोपर्यत धरतात जोपर्यंत मुल योग्य मार्गावर वाटचाल करत नाही. ज्यावेळी मुल योग्य मार्गाने प्रवास करू लागतात तेव्हा ते अलगत हात काढून घेतात आणि मुलांच्या उज्वल भविष्याची प्रार्थना करतात.

त्यानंतर प्रवासात साथ देण्यासाठी हात पुढे करते ती बायको. तसेच ती या प्रवासात शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करते. परंतु अनेक वेळा तिच्याकडेच दुर्लक्ष होते. ती नकळत संसाराचा बराचसा भार घेत असते.

संसाराच्या याच प्रवासाच्या उतारवयात माणसाला या सोबतीची गरज वाटू लागते. पुन्हा एकत्र जगण्याची आणि वेळ घालवण्याची इच्छा माणसाला होते. उतारवयातील ती सोबत माणसाला नकळत उभारी देत असते.

आज आपण अश्याच एका व्हिडिओमधून उतारवयातील सोबतीची गरज ओळखणार आहोत. या व्हिडिमध्ये आपल्याला दोघांमधील प्रेमाचा अंदाज येऊ शकतो. तसेच ‘साथ द्यायची तर अशी द्या’ हे हा व्हिडिओ उत्तम उदाहरण आहे.

व्हिडिओमध्ये आजोबांची तब्येत खराब असतानाही हॉस्पिटलमध्ये बायकोचा हात हातात घेऊन तिला पुन्हा उत्साहाने बरे होण्याची उभारी देत आहेत. यावरून एक लक्षात येत की अडचणीच्या वेळी जवळच्या व्यक्तीचा हात हातात असण किती गरजेच आहे.

हे ही वाचा-

बायको घरी नसताना मैत्रिणीला घरी बोलावलं, तासाभरात जे घडलं, त्याने तरुणच हादरला

इंडिअन आयडल १२: सोनू कक्कडला शोची जज म्हणून पाहताच लोक भडकले, म्हणाले संपूर्ण कार्यक्रमातच गडबड

VIDEO: साडी घालून महिलेने केला जबरदस्त डान्स; आतापर्यंत ९० लाख लोकांनी बघितला व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.