नामांतराच्या मुद्यावरून मनसे आक्रमक, शिवसेना नेत्याची गाडी अडवत विचारला जाब

औरंगाबाद |  औरंगाबाद शहराचे नामांतरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपुर्वी मनसेने औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याचा अल्टिमेटम ठाकरे सरकारला दिला होता. मात्र यानंतरही ठाकरे सरकार काहीच ठोस निर्णय घेत नसल्याचं पाहून मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकात खैरेंची गाडी अडवून त्यांना जाब विचारला.

माजी खासदार चंद्रकांत खैरेंची गाडी शहरातील क्रांती चौकात येणार असल्याचं मनसे कार्यकर्त्यांना समजताच मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. चंद्रकांत खैरेंची गाडी येताच जय भवानी जय शिवाजी…, राज्य सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणा देत खैरेंच्या गाडीला चारही बाजूंनी घेराव घालत त्यांना गाडीच्या खाली उतरण्यास भाग पाडले.

खैरेंनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सूरवात केली. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर का होत नाही? असा सवाल त्यांनी विचारला. शिवसेनेच्या निषेधाच्या घोषणा देत निषेध पत्रकं चंद्रकांत खैरेंच्या अंगावर भिरकावली.

दरम्यान नामांतराच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा नाही काढला तर वेळ आल्यावर आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची गाडी अडवण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला आहे

मनसेचं आंदोलन म्हणजे नौटंकी

चंद्रकात खैरेंनी मनसेचे हे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचं म्हटलं आहे. तसेच शिवसेना औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावेल. असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईकरांच्या ‘त्या’ भावनिक क्षणामुळे आनंद महिंद्राही झाले भावूक, प्रार्थना करत म्हणाले..
किती ते प्रेम! जेनेलियाने चावला रितेशचा कान, म्हणते प्रेमात पुर्णपणे वेडी झाली आहे; पाहा व्हिडीओ
“शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्याचं विधान
मोठी बातमी! नाना पटोले यांनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.