पुण्यातील ८५ वर्षीय वॉरियर आजींवर आली पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ; वाचा काय आहे कारण

पुणे |  ऐन लॉकडाऊमध्ये रस्त्यावर लाठ्याकाठ्या फिरवणाऱ्या आजीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. पुण्यातील हडपसर परिसरात छोट्याशा खोलीत राहून पोटाची खळगी भरण्यासाठी ८५ वर्षीय शांताबाई पवार डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या कसरती करत होत्या.

हडपसरमध्ये गोसावी वस्ती राहणाऱ्या आजींच्या मागे मोठा परिवार आहे. मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार शांताबाई आजींचा आहे. मात्र मुलांचा सुनेंचा मृत्यू झाल्याने नातवंडांसाठी आजी रस्त्यावर कसरती करायच्या.

लॉकडाऊमध्ये काठी हातात घेऊन आपली कला उत्कृष्टपणे सादर  करत आजींनी अनेकांना भूरळ घातली होती. शांताबाई नातवंडांसाठी वृध्दापकाळातही धडपड करत असल्याचं पाहून कलाकार, तत्कालिन गृहमंत्री आजीच्या मदतीला पुढे सरसावले होते.

तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या आजीला १ लाख रुपये आणि साडी दिली होती. गायिका नेहा कक्करने इंडियन आयडलच्या मंचावर बोलावून एक लाख रुपयांची मदत केली होती.

अभिनेता सोनू सुदने ट्रेनिंग सेंटर सुरू करून शांताबाई आजी महिलांसाठी संरक्षणाचे तंत्र शिकवणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच लाखो रुपयांची मदतही केली होती. दिल्लीमध्ये आजींचा सत्कारही करण्यात आला होता.

मात्र कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांवर मोठा डोंगर कोसळला आहे. त्याचप्रमाणे आजींनाही मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आजी पुन्हा पुण्यातील रस्त्यांवर काठी फिरवण्याची कला दाखवताना दिसत आहेत.

येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून देण्यात आलेल्या पैशावर आजी पोट भरतात. नातवंडांसाठी मला हे करावचं लागेल. असं शांताबाई आजी म्हणतात. अभिनेता सोनू सुद, गृहमंत्री अनिल देशमुख, गायिका नेहा कक्कर  यांनी दिलेल्या पैशावर आमचे कर्ज फिटले आहे. असं शांताबाई आजी म्हणतात.

पण हे पैसे किती दिवस पुरणार आहेत. आजीच्या खात्यामध्ये सध्या एक रुपयाही शिल्लक नाही. त्यामुळे आजींनी पुन्हा रस्त्यावर येण्यास सुरूवात केली आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी माझ्या नातवंडांसाठी करणार असल्याचं आजींनी म्हटलं आहे.

शांताबाई आजींकडे फक्त लाठीकाठी फिरवण्याची कला नाही. तर त्या तारेवर विविध कसरती सुध्दा करत होत्या. तसेत तारुण्यात त्यांनी चित्रपटांमध्ये कामही केले आहे. मात्र आजींवर फार वाईट वेळ आल्याने ही दुर्देवाची गोष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या-
नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी अनवाणी मॅरेथाॅनमध्ये धावणाऱ्या लता करेंच्या पतीचा कोरोनात मृत्यू
टाटा पन्हा आले मदतीला धावून; ‘नो लिमिट्स’ योजनेतून दिले २०००कोटी; जाणून घ्या काय आहे ही योजना
आश्चर्यकारक! २५ वर्षीय महिलेने एकाच वेळी ९ बाळांना दिला जन्म
VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.