ऐकावं ते नवलचं! Chutia ही शिवी नाही, तर एका महिलेचं आडनाव आहे; अन् यामुळे…

 

गुवाहाटी। Chutia ही शिवी नसून आसाम मधील एका महिलेचे आडनाव आहे. ऐकायला हे नवलचं वाटतंय ना? पण हे खरं आहे. प्रियांका असे या महिलेचे नाव असून तिचे आडनाव Chutia असे आहे.

Chutia हा शब्द वाचल्यानंतर ती एक शिवी असल्याचे आपल्या लक्षात येते. परंतु या शब्दामुळे प्रियांकाचा नोकरीसाठीचा ऑनलाइन अर्ज देखील स्वीकारला जात नव्हता.

प्रियांका आसामच्या गोगामुख शहरातील रहिवासी आहे. तिने कृषी अर्थशास्त्र आणि शेती व्यवस्थापनात पदवी मिळवली आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ( National Seed Corporation Limited) ती नोकरीसाठी प्रयत्न करत होती.

NSCL च्या वेबसाइटवरून जॉबसाठी अॅफ्लिकेशन करताना वारंवार तिचे आडनाव नाकारले जात होते. Chutia हा एक अपशब्द असल्याने सॉफ्टेवअरमध्ये तरुणीचे नाव रिजेक्ट केले जात होते.

आडनावात अपशब्द वापरू नका योग्य शब्द वापरा असा मेसेज सॉफ्टवेअरमार्फत येत होता. आधीच आपल्या आडनावाबाबत लोकांना स्पष्टीकरण देऊन नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करतानाही त्याच समस्येला तोंड द्यावे लागल्याने महिला वैतागली.

अखेर तिने फेसबुकवर आपला राग व्यक्त केला. प्रियांका म्हणाली की, “नोकरीसाठी माझं अ‍ॅप्लिकेशन नाकारण्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही तर माझं आडनाव आहे. पोर्टल मला सातत्याने नावात योग्य शब्द वापरण्यास सांगत आहे.

मला खूप वाईट वाटतं आहे आणि ही शिवी नाही तर माझा एक समाज आहे, याबाबत लोकांना स्पष्टीकरण देऊन मी आता वैतागले”. Chutia हा आसाममधील खूप जुना असा एक समाज आहे. याचा उच्चार सुटिया असा केला जातो.

या आडनावाबाबत आणि समाजाबाबत सर्वांना माहिती असावी यासाठी आपण आपला अनुभव फेसबुकवर मांडल्याचे तिने सांगितले आहे. यानंतर प्रियांकाने NSCL तिला होत असलेल्या या समस्येबाबत लेखी कळवले. संस्थेने त्याची दखल घेतली आणि तिचा अर्ज स्वीकारला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.