Share

‘त्याची तंगडी तोडल्याशिवाय राहणार नाही’; राज ठाकरेंना नडणाऱ्या ब्रिजभुषणसिंगला मनसेची जाहीर धमकी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. यामुळे मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे पहायला मिळालं आहे. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशच्या लोकांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवून देणार नाही, अशी ठाम भूमिका खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे.

ब्रिजभूषण सिंह यांचा  मंगळवारी राष्ट्रवादीच्या नेत्यानसोबतचा फोटो मनसेने सोशल मीडियावर टाकला आहे. फोटो सोशल मीडियावर टाकून राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत. मनसेचे खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी  ब्रिजभूषण यांना व्हिडिओच्या माध्यमातून थेट इशारा दिला आहे.

पुण्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित झाल्याचे कारण सांगितले आहे. हिंदूत्वाची भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. या घोषणेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा काहींना राजकीय वाटत आहे. राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातून सर्वासाठी रसद पुरवली गेली होती. एक हिंदू दुसऱ्या हिंदूला आडवा कसा येतो, याचं उत्तम उदाहरण ब्रिजभूषणच्या माध्यमातून लोकांना पहायला मिळत आहे. रामलल्लांच्या दर्शनासाठी राज ठाकरे जाणार होते, पण ब्रिजभूषण सिंहने राज ठाकरेंना अयोध्येत येऊ न देण्याची भूमिका घेतली आहे.

ब्रिजभूषणच्या समर्थकांकडून ५ तारखेला येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला शरयू नदीत बुडवून मारण्याची धमकी दिली आहे. ब्रिजभूषण हिंदू असून हिंदूना विरोध करतो ही खंत वाटत आहे. एमआयएमच्या अकबरुद्दीन ओवेसीने औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली दर्शन घेतलं, त्याबाबत ब्रिजभूषण ने एक शब्दही तोंडातून काढला नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज ब्रिजभूषण मुंबईत येऊन सभा घेणार असल्याचंं ट्विट केलं आहे.  महाराष्ट्राची, राज ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो ब्रिजभूषण ने या महाराष्ट्राच्या मातीत पाय ठेवून दाखवावा, त्याची तंगडी तोडल्याशिवाय राहणार नाही, मराठी माणसाला डुबवण्याची भाषा करणाऱ्या आणि एक हिंदू असून हिंदूला विरोध करणाऱ्या या नालायकाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय एक महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही, असा इशारा वैभव खेडेकर यांनी ब्रिजभूषण सिंह यांना दिला आहे.

महत्वांच्या बातम्या:-
काॅंग्रेसचे बडे नेते कपिल सिब्बल यांनी दिला पक्षाचा राजीनामा; आता जाणार ‘या’ पक्षात
काँग्रेसच्या देशपातळीवरील मोठ्या नेत्याचा राजीनामा, सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार
संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देणार होतो, पण आता…; संजय राऊतांनी आरोप फेटाळत स्पष्टच सांगितलं

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now