गावच्या पोलिस पाटलावर हात उचलणे पडणार महागात, होणार ‘ही’ मोठी कारवाई

मुंबई | गावपातळीवरील महत्वाचा घटक म्हणून पोलिस पाटलाकडे पाहिले जाते. गावात शांतता ठेवण्यास मदत करणे, गावातील घटना पोलिसांना कळवणे, गावातील माहिती पोलिस अधिकाऱ्यांना देणे अशी अनेक कामे पोलिस पाटलाला करावी लागतात.

पोलिस पाटील पदी काम करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी कधी गावातील लोकांकडून पोलिस पाटलाला मारहाणही करण्यात येते. गावातील राजकारण्यांचा त्रास पोलिस पाटलाला सहन करावा लागतो.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस पाटलांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलिस पाटलाला इथून पुढे कुणी मारहाण केली तर त्या आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा अजामीनपात्र गून्हा दाखल होणार आहे. यामुळे पोलिस पाटलांना कुठल्याही भीतीशिवाय निर्धास्तपणे काम करता येणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचे पोलिस पाटील संघटनेने स्वागत केले आहे. पोलिस पाटलांच्या विविध प्रश्नांवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत बैठक बोलावली होती. त्यावेळेस पोलिस पाटलांच्या विविध मागण्या, काम करत असताना येणाऱ्या अडचणी यांसारख्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या-
गेले महिनाभर मी तीन कमिशनर व दोन एसपींना गुंगारा देत होतो; पकडल्यानंतर गजा मारणेची दर्पोक्ती
एमपीएससीची परीक्षा झालीच पाहीजे; रोहीत पवारांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात थोपटले दंड
‘या’ योजनेत एकरकमी प्रीमियम भरा, आणि ‘आजीवन पेन्शन’ मिळवा, जाणून घ्या  
नो पार्किंगला गाडी लावणे तरूणीला पडले महागात, पोलिस कर्मचाऱ्याने थेट कानाखालीच मारली

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.