नागपूरमधील खापरखेड्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पॉ’र्न क्लिप पाहत त्या पद्धतीने संभोग करण्याच्या नादात तरूणाला जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, नागपूरच्या टेकानगर परिसरात राहणाऱ्या तरूणाचे एका तरूणीशी प्रेमसंबंध होते. तरूण हा इंजिनीयर असून सध्या तो बेरोजगार होता. तरूणी खासगी कंपनीत नोकरी करत होती. गुरूवारी दोघेही नागपूरच्या दहेगाव परिसरात आले त्यानंतर त्यांनी लॉजमध्ये खोली घेतली.
लॉजमध्ये गेल्यावर संभोग करत असताना मोबाईलवर त्यांनी पॉ’र्न व्हिडिओ लावली. पॉ’र्न व्हिडिओप्रमाणे तरूणीने तरूणाचे हातपाय दोरीने बांधून गळ्याभोवती दोर आवळला त्यानंतर त्याच पद्धतीने त्यांनी संभोग केला.
थोड्या वेळानंतर तरूणी बाथरूममध्ये गेली. बाहेर आल्यानंतर तरूणीला तरूणाची हालचाल बंद झाल्याचं दिसून आलं. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मृत्यू झाल्याचं तिला समजलं.
घाबरलेल्या तरूणीने आरडाओरडा केल्यानंतर लॉज व्यवस्थापकाने खोलीकडे धाव घेतली. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तरूणाचा मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
याबाबत पुढील तपास खापरखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सूर्यप्रकाश मिश्रा करत आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
रोहित शर्माने केला विश्व विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
‘कोरोनामुळे परवानगीची प्रक्रिया पुर्ण झाली नाही’; अनधिकृत बांधकामवर सोनू सूदचे स्पष्टीकरण
महाराष्ट्रात पुन्हा गाजणार आखाडा! महाराष्ट्र केसरी स्पर्धेला राज्य सरकारची परवानगी