सिरीज हरल्यानंतर न्युझीलंडच्या खेळाडूला उपरती; म्हणतो ‘ही सिरीज बिनकामाची आहे’

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ‘मिचेल मॅकक्लॅनेघन’ याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली टी-२० मालिका “अर्थहीन” असल्याचे म्हटले आहे. भारताने सलग दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकून मालिका अगोदरच जिंकली आहे.

मॅकक्लॅनेघनने ट्विटरवर एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर कमेंट केल्यानंतर एका क्रिकेट चाहत्याने न्यूझीलंडच्या टी-२० मालिकेत भारताकडून झालेल्या पराभवाची आठवण करून दिली.

यावर मॅकक्लॅनेघनने उत्तर दिले, ‘टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर ७२ तासांनी ५ दिवसांत ३ सामने १० दिवसांच्या विश्रांतीसह त्यांच्या घरच्या परिस्थितीत टीम सोबत खेळणे म्हणजे ही एक ‘निरर्थक’ मालिका आहे.’

मॅकक्लॅनेघन शेवटचा न्यूझीलंडकडून २०१८ मध्ये खेळला होता. १४ नोव्हेंबर रोजी दुबईत झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडच्या झालेल्या पराभवाचा तो उल्लेख करत होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली.

न्यूझीलंडने पहिला सामना पाच विकेट्सने तर दुसरा सामना सात विकेटने गमावला होता. तिसरा सामना रविवारी कोलकाता येथे होणार आहे. ३५ वर्षीय मॅकक्लॅनेघनने २०१२ मध्ये पदार्पण केल्यापासून ४८ एकदिवसीय आणि २९ टी-२० सामने खेळले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.