अजित पवारांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले असा त्याचा अर्थ होत नाही- संजय राऊत

पारनेर । पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत चांगलेच राजकारण रंगल आहे.

संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पारनेरमध्ये आमच्या नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास व्यक्त केला.

सरकारमध्ये कोणतेही मतभेद, कुरबुरी, नसल्याचे सांगितले आहे. पारनेरच्या मुद्द्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा झाली आहे.

हा स्थानिक पातळीवरचा विषय होता, तो तिथेच संपायला हवा होता. आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अजित पवारांनी नगरसेवक फोडले असा याचा अर्थ होत नाही. आता हा विषय चर्चेत येऊ नये, असे मला वाटते. असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.