गूगल मॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच इस्त्रो आणणार स्वदेशी मॅप; जाणून घ्या फायदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून गूगल मॅपला टक्कर देण्यासाठी इस्त्रो आणि मॅप माय इंडिया यांच्या संयुक्तपणे लवकरचं भारतात मॅप येणार आहे. यामुळे देशातील नागरिकांना व्हॉट्स अ‍पला जसा ‘संदेस’ आणि ट्विटरला पर्याय ‘कू’ आला आहे. तसाच गूगल मॅपला मॅप माय इंडिया येणार आहे.

मॅप माय इंडिया आणि इस्त्रो उपग्रहांच्या मदतीने माहिती गोळा करून नकाशे तयार करणार आहे. त्यानंतर मॅप माय इंडिया ही कंपनी भारतातील लोकांना रस्त्यांचा शोध घेणे आणि वाहतूक कोंडी असेल तर दूसरा रस्ता शोधणे याची माहिती मॅपच्या माध्यमातून देणार आहे.

गूगल मॅपकडून भारतातील रस्ते दाखवताना काही वेळा चूका होतील पण भारतातील या मॅपमध्ये असा कोणताच घोळ होणार नाही. असं कंपनीचे सीईओ रोहन वर्मा यांनी सांगितले आहे.

 

 

मॅपचे फायदे

या मॅपमुळे पर्यटक, प्रवासी यांना फायदा होणार आहे. यात तुम्ही ज्या ठिकानाहून जात आहात त्या परिसरातील दुकाने, दवाखाने, पेट्रोल पंप, हॉटेल्स, शाळा याची माहिती कळेल. यामूळे प्रवासात कुठलीचं अडचण येणार नाही.

सध्या मॅप माय इंडिया यांच्याकडे ६३ लाख किमी परिसरातील साडेसात लाख गावातील ७ हजार ५०० पेक्षा जास्त शहरातील रस्त्यांची माहिती आहे. तसेच तीन कोटींपेक्षा जास्त ठिकानांची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; कांद्याचे दर आणखी वाढणार
”ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या दलिताला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही”
१२ आणि ३३० रूपये भरून मिळवा दोन लाख; मोदी सरकारची गरिबांसाठी विमा योजना

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.