कहाणी त्या गुप्तहेराची जो दुसऱ्या देशाचा संरक्षणमंत्री बनणार होता, पण एका चुकीमूळे झाला भांडाफोड

गुप्तहेरांचे जग बरेच रहस्यमयी असते. गुप्तहेर बाहेरच्या देशात जातात आणि तेथील माहिती आपल्या देशात पाठवतात जी त्यांच्या देशासाठी धोकादायक असते. ही माहिती जरी तुम्हाला ऐकायला सोपी वाटत असेल, परंतु वास्तविक जीवनात हे करणे मरणाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

साध्या शब्दांत सांगायचे तर, हे काम एक असे आहे ज्यामध्ये नेहमी जीवाचा धोका असतो. हेरगिरी करताना जर ते दुसऱ्या देशात पकडले गेले तर तेथील कायद्यानुसार त्यांना कठोर शिक्षा केली जाते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका गुप्तहेराबद्दल सांगणार आहोत जो दुसऱ्या देशात संरक्षणमंत्री होणार होता. पण त्याच्याकडून चुक झाली आणि तो पकडला गेला.

आम्ही बोलत आहोत इस्त्रायली गुप्तचर यंत्रणेचा गुप्तहेर एली कोहेनबद्दल. त्याला इस्रायलचा सर्वात शूर, धाडसी आणि सय्यमी गुप्तहेर मानले जाते. त्यांनी अशी गोष्ट करून दाखवली होती की कदाचित त्यांच्या देशातील कोणालाही ही कल्पना सुचली नसती.

असे म्हटले जाते की कोहेनने अशी रणनिती आखली होती की, ज्यामुळे इस्त्रायलने १९६७ मध्ये युद्ध जिंकले होते. एली कोहेन यांनी इस्त्राईलचे गुप्तहेर म्हणून १९६१ ते १९६५ दरम्यान सीरियामध्ये आपल्या शत्रूंमध्ये चार वर्षे घालवली होती.

एक व्यापारी म्हणून त्याने सीरियामध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती आणि या वेषात तो सिरियाच्या सत्तेच्या अगदी जवळ आला होता. यावेळी त्यांनी तेथील सत्ताधारी यंत्रणेतही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या जवळचे स्थान मिळवले होते.

असे म्हणतात की राष्ट्रपती अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये त्याचा सल्ला घ्यायचे. एलीचा जन्म इजिप्तच्या अलेक्झांड्रिया येथे १९२४ मध्ये सिरियन-ज्यू कुटुंबात झाला. त्याचे वडील इजिप्तमध्ये स्थायिक झाले होते ते अलेप्पो, सीरियाहून आले होते.

परंतु १९४८ मध्ये इस्त्राईल बनले तेव्हा इजिप्तच्या बर्याच ज्यू कुटुंबांनी तेथून स्थलांतर करण्यास सुरवात केली. त्यापैकी एली कोहेन यांचे कुटुंब होते. १९४९ मध्ये ते इस्रायलमध्ये स्थायिक झाले. दरम्यान, या काळात कोहेन इजिप्तमध्येच राहिला कारण इलेक्ट्रॉनिक्स विषयाचा त्यांचा अभ्यास अपूर्ण होता.

असे म्हटले जाते की अरबी, इंग्रजी आणि फ्रेंचवर कोहेनची पकड खूप मजबूत होती आणि म्हणूनच तो इस्त्रायली गुप्तचर विभागाच्या नजरेत आला. वृत्तानुसार एलीला सुरुवातीपासूनच हेरगिरी करण्यात रस होता आणि म्हणूनच तो १९५५ मध्ये हेरगिरीच्या छोट्या कोर्ससाठी इस्राईलमध्ये गेला होता.

त्यानंतरच्या वर्षी तो इजिप्तला परत आला, परंतु कोहेन यांच्यासह बरेच लोक स्वेज संकटानंतर इजिप्तमधून बाहेर काढण्यात आले आणि नंतर ते १९५७ मध्ये इस्रायलमध्ये गेले. येथे आल्यानंतर त्यांनी अनुवादक आणि लेखापाल म्हणून काम करण्यास सुरवात केली.

दरम्यान, त्याने इराकी-ज्यू-मुलगी नादिया माझलडशीही लग्न केले. एलीच्या जीवनाची खरी कहाणी १९६० पासून सुरू झाली. जेव्हा त्याला इस्त्रायली गुप्तचर विभागात दाखल करण्यात आले. १९६१ मध्ये त्याला मिशनवर पाठवण्यात आले.

एली कोहेन यांना प्रथम इस्त्रायली गुप्तचर विभागाने ‘कामिल अमीन ताबेत’ असे नाव दिले आणि नंतर त्यांना एक व्यापारी बनवण्यात आले आणि अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथे त्यांना पाठवण्यात आले. कोणाला जराही वाटत नव्हते की तो व्यापारी एक गुप्तहेर आहे. ते त्या माणसांमध्ये मिसळून गेले होते.

येथे त्यांनी सिरियन समाजातील लोकांशी संपर्क वाढविला आणि हळूहळू सिरियन दूतावासात काम करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांशी मैत्री केली. यामध्ये अरीन-हाफिज हा सिरियन सैन्यातील एक वरिष्ठ अधिकारी होता. एली कोहेनच्या मदतीने तो सिरियाचा अध्यक्ष बनला होता.

१९६२ मध्ये, ‘कामिल अमीन ताबेत’ बनलेला एली सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये स्थायिक झाला आणि त्यानंतर त्याचा खरा खेळ सुरू झाला. त्याने सीरियन सैन्याशी संबंधित सर्व माहिती रेडिओ संप्रेषणाद्वारे इस्राईलला पाठवायला सुरवात केली.

१९६३ मध्ये जेव्हा सीरियामध्ये कायापालट झाले आणि अमीन अल-हाफिज अध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी एली यांना सिरियाचे उप संरक्षणमंत्री पद देण्याचा निर्णय घेतला होता. पण १९६५ मध्ये, सीरियन गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या रेडिओ ट्रान्समिशनची माहिती मिळाली आणि त्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.

त्यांनतर त्यांना काय शिक्षा देण्यात आली याची माहिती मिळालेली नाही. पण त्यांच्या या कार्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. एक गुप्तहेर काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले होते. आजही अनेक गुप्तहेर त्यांना आपले रोल मॉडेल मानतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
छत्रपतींचे वंशज असलेल्या खासदार संभाजीराजेंच्या मागे मराठा समाज का उभा आहे?
रंजीत नाथ: कोरोनाच्या काळात रोज १५० भटक्या कुत्र्यांना बिर्याणी खाऊ घालणारा देवमाणूस
लोकप्रिय गायिकेचा तुटला साखरपुडा, आपल्या जेंडरची ओळख झाल्यानंतर केला धक्कादायक खुलासा
जेवढे सोनं जमा झाले आहे, त्यातून दवाखाना, मेडिकल कॉलेज उभारणार, ‘या’ देवस्थानचा मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.