हिंदुस्तानी भाऊला मिळाली आयएसआय कडून जीवे मारण्याची धमकी

 

मुंबई | हिंदुस्तानी भाऊ आपल्या व्हिडिओ आणि अंदाजासाठी खूप ओळखला जातो.पण आता हिंदुस्तानी भाऊंनी ट्विटरच्या माध्यमातून त्याला आयएसआयच्या कर्नल कडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे म्हंटले आहे.

याबद्दल ट्विटरवरून माहिती देताना हिंदुस्तानी भाऊ ने ज्या नंबर वरून त्याला धमकीचा फोन आला तो नंबर ट्विटमध्ये लिहून त्या कॉल ची पूर्ण रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचे सांगितले आहे.

याव्यतिरिक्त हिंदुस्तान भाऊने आणखी एक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.

हिंदुस्तानी भाऊ सोशल मीडियावर खूप ॲक्टिव असतो. काही दिवसांपूर्वी त्याने एकता कपूरच्या वेब सीरिजवर आक्षेप घेत तक्रारही दाखल केली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.