प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा गोव्यातील खाडीत कार कोसळून मृत्यू; पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीच दुर्दैवी अंत

मराठी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील नवोदित अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा अपघात झाला असून हा अपघात इतका गंभीर होता की याच्यातच तिचा मृत्यु झाला आहे. पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिचा मृत्यु झाला आहे.

ईश्वरी आपल्या मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेली होती. तिथेच त्यांचा अपघात झाला असून या अपघातात तिचा आणि तिच्या मित्राचा मृत्यु झाला आहे. उत्तर गोव्यातील अरपोरा भागातील खाडीत कार कोसळून सोमवारी सकाळी त्यांचा अपघात झाला आहे.

पुण्यात राहणाऱ्या ईश्वरीचे वय २५ वर्षे होते, तर तिचा मित्र शुभम देडगे याचे वय २८ वर्षे इतके होते. ईश्वरीचा पहिला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार होता. पण त्याआधीच तिचा मृत्यु झाल्यामुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

ईश्वरीने एका मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. या दोन्ही सिनेमांचे चित्रीकरण पुर्ण झाले होते, मात्र ते रुपेरी पडद्यावर दिसण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला आहे. तसेच ईश्वरी आणि शुभम दोघेही एकवर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघेही पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार होते. पण संसार सुरु होण्यापुर्वीच त्यांचा अपघाती मृत्यु झाला आहे.

सुनील चौथमल दिग्दर्शित प्रेमाचे साईड इफेक्ट्स हा ईश्वरी देशपांडेचा पहिला चित्रपट होता. तसेच या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण झालेले होते. प्रेमाचे साईड इफेक्ट्स या चित्रपटात तिने रवी जाधव, संजय जाधव, उमेश कुलकर्णी आणि सुजय डहाके सारख्या नामांकीत कलाकारांबरोबर तिने काम केले होते.

महत्वाच्या बातम्या-

यापुढे किर्तनकार पद लाऊ नका! बिग बाॅसमध्ये गेल्याने शिवलीला पाटलांवर महाराज मंडळी भडकली
‘जैवलिन – एक प्रेम कथा’ ‘गोल्डन बॉय’ची जाहिरात क्षेत्रात दमदार एंन्ट्री..
रितेश देशमुख आणि जिम ट्रेनरमध्ये मारहाण; हात जोडून रितेश देशमुखने मागितली माफी, म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.