टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांच्या यादीत गणला जातो. विशेषतः म्हणजे कसोटी क्रिकेट सामन्यांमधी गणला जातो. आत्तापर्यंत, कपिल देव व्यतिरिक्त, कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाने जास्त कसोटी आणि विकेट घेतलेल्या नाहीत.
कपिल देव यांनी 131 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 434 विकेट घेतल्या आहेत. तर इशांतने 105 कसोटीत 311 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या इशांत शर्माने पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इशांतने स्वत:चे नाव कमावले.
पण एक वेळ अशी आली की त्याची कारकीर्द संपणार असे वाटत होते. 2013 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात इशांतने एका षटकात 30 धावा दिल्या होत्या. जेम्स फॉकनरने आपल्या एका षटकात 4 षटकार आणि एक चौकार लगावला.
इशांतने सांगितले की, तो सामना संपल्यानंतर महिनाभर सतत रडत होता. तथापि, त्याने असेही सांगितले की एमएस धोनी आणि शिखर धवनने त्याला मदत केली होती. क्रिकबझशी खास बातचीत करताना इशांत शर्मा म्हणाला की, २०१३ साली माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण मोहालीच्या सामन्यात आला.
हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. मी जास्त धावा दिल्या म्हणून नाही. उलट मला वाईट वाटत होतं कारण माझ्यामुळे संघ हरला होता. त्यावेळी मी माझ्या पत्नीला डेट करत होतो. मी तीच्याशी बोललो तेव्हा मी अनेक महिने रडलो. मी तिला रोज फोन करायचो आणि फोनवर रडायचो.
इशांत पुढे म्हणाला की, त्या दिवशी धोनी भाई आणि शिखर धवन माझ्या खोलीत आले हे माझ्यासाठी चांगले होते. ते मला म्हणाले, तू चांगला खेळत आहेस बघ. इशांत म्हणाला की, त्या एका सामन्यामुळे लोकांच्या मनात हे पक्के झाले होते की मी पांढऱ्या चेंडूचा गोलंदाज नाही.
इशांत शर्मा भारताकडून शेवटचा खेळ डिसेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यानंतर तो टीम इंडियातून बाहेर पडला. 2016 मध्ये तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. 2013 मध्ये त्याने संघासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता.
महत्वाच्या बातम्या
दोन रुपयांचा चेक मिळालेल्या शेतकऱ्याची कृषीमंत्री दादा भुसेंनी लावली थट्टा; म्हणाले, मालेगावमध्ये…
कोण मारणार बाजी? एक्झिट पोलमधून धाकधूक वाढवणारी आकडेवारी आली समोर
पुण्याच्या गोल्डमॅनचा दीड कोटींचा सोन्याचा शर्ट लंपास: धक्कादायक माहिती आली समोर