नववीची परीक्षा की क्रिकेट? बापाने काळजावर दगड ठेवून घेतलेल्या निर्णयाचं इशानने चीज केलं

अहमदाबाद | टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात मागच्या परभवाचा वचपा काढत इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय संघातील युवा खेळाडू इशान किशन यानं रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात पदार्पणाच्याच खेळीत क्रीडारसिकांची मनं जिंकली.

मुलाची भारतीय टीममध्ये निवड झाल्याचं कळताच इशान किशनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. इशानचे वडील म्हणतात, ‘लहानपणापासूनच त्याचं स्वप्न भारतासाठी खेळायचं होतं. आता हे स्वप्न अखेर पूर्ण होईल. यासाठी त्याने खूप मेहनत केली होती, असे त्यांनी सांगितले.

तसेच इशान नववीमध्ये होता, तेव्हा त्याची परीक्षा होती आणि मॅचही होती. परीक्षेला बसला नाही, तर शाळेतून काढू असं शिक्षकांनी सांगितलं होतं. पण मी मुलाला साथ दिली आणि तो मॅच खेळला. आईला मात्र मुलगा कमीतकमी मॅट्रिक तरी व्हावा, असं वाटत होतं,’ असे इशानच्या वडिलांनी सांगितले.

दरम्यान, इशानच्या आईने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर इशान नाव कमवत नाही, तोपर्यंत आपण स्टेडियममध्ये मॅच बघायला जाणार नसल्याचे आईने सांगितले आहे.

कारकिर्दीतील पहील्याच सामन्याच इशांतने पाडला चौकार षटकारांचा पाऊस
इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या टी20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इशान किशन यानं २८ चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली. चौकार आणि षटकारांची बरसात करत त्यानं विरोधी संघाच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. षटकाराच्याच सहाय्यानं त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं एकूण ३२ चेंडूंमध्ये ५६ धावांची प्रभावी खेळी करत सर्वांचीच दाद मिळवली.

महत्त्वाच्या बातम्या 

‘तु फक्त मुंबईत येऊन भेट, तुझं लग्न मी लावतो’; सलमान खानचा त्या दोन फुटी बुटक्याला शब्द

सुनीता गांधी: अशी शिक्षिका जी गरीब मुलांना तीस तासात बनवत आहे साक्षर, वाचा कसे…

आयपीएल ऑक्शनमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या शाहरूख खानबद्दल १० गोष्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.