Share

6,6,4,4! आफ्रिकेच्या केशव महाराजला ईशान किशनने धु धु धुतलं, पाहा जबरदस्त व्हिडीओ

इशान किशनसाठी यंदाची आयपीएल एखाद्या दुखद स्वप्नापेक्षा कमी नव्हती. ना तो धावा करत होता ना मुंबई इंडियन्स स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला. या युवा फलंदाजाच्या फॉर्मवर अचानक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. असे असतानाही निवडकर्त्यांनी त्याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघात समावेश केला.

ईशान किशन आता त्याच भरवशावर जगत आहे. गुरुवारी संध्याकाळी दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकून टीकाकारांना शांत केले. सलामीला येताना, इशानने प्रथम रुतुराज गायकवाड सोबत 57 धावांची जलद भागीदारी केली.

त्यानंतर श्रेयस अय्यरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 40 चेंडूत 80 धावा जोडल्या, दोन्ही भागीदारीतील बहुतांश धावा इशानच्या बॅटमधून आल्या. 11 चौकार आणि 3 षटकारांसह इशानचा स्ट्राइक रेट 158.33 होता. अर्धशतक झळकावल्यानंतर तो अधिकच घातक दिसत होता.

त्याने 11व्या षटकात केशव महाराजला षटकार ठोकत 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर जेव्हा केशव महाराज त्यांचे पुढचे आणि डावाचे तेरावे षटक टाकत होता तेव्हा दोघांमध्ये जबरदस्त जुंपली होती. सुरुवातीला इशान पूर्णपणे वरचढ दिसत होता, पण नंतर खेळ उलटला.

डावाची सुरुवात करणाऱ्या केशव महाराजने पहिल्या दोन षटकात 23 धावा दिल्या होत्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. तिसऱ्या षटकात इशान किशनने त्याचे स्वागत केले. पहिले दोन चेंडूंवर षटकार ठोकले त्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर चौकार मारले. शेवटच्या चेंडूवर त्याला वाईड लाँग ऑनवर ईशान किशन बाद झाला.

मेगा लिलावात सर्वात महागडा विकणारा ईशान किशन आयपीएलमध्ये 14 सामन्यांत केवळ 418 धावा करू शकला. पहिल्या दोन सामन्यात त्याने सलग दोन अर्धशतके निश्चितच केली, पण जसजशी स्पर्धा पार पडत गेली तसा त्याचा आलेखही घसरत राहिला. इशान किशनने गुजरात लायन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2018 च्या लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतले.

https://twitter.com/SalgarShravani/status/1535120669729402880?s=20&t=ohkT8Y0LHSJBPPbCDGgjmQ

महत्वाच्या बातम्या
“तर मग हा शो बंद करून…” , ‘तारक मेहता’ मालिकेच्या निर्मात्यांवर चाहते संतापले
आमदारांच्या क्रॉस वोटिंगमुळे भाजपने दुसऱ्या उमेदवाराची आशा सोडली, प्रदेशाध्यक्षांनी दिली जाहीर कबुली
रिकी पॉन्टिंगने दिल्ली नाही तर ‘या’ संघाशी केला ३ वर्षांचा करार, दिल्ली कॅपिटल्सला आले टेंशन
अन् आदित्य ठाकरेंचं मतदान बाद होता होता राहिलं; जाणून घ्या ठाकरेंसोबत विधानभवनात नक्की काय घडलं

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now