इशान किशनची गर्लफ्रेंड आहे मॉडेल, हॉट फोटोंचा सोशल मिडीयावर धुराळा

अहमदाबाद | भारतीय संघातील युवा खेळाडू इशान किशन यानं रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात पदार्पणाच्याच खेळीत क्रीडारसिकांची मनं जिंकली. टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात मागच्या परभवाचा वचपा काढत इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.

आदिती हुंडई असे इशान किशनच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. आदिती प्रसिद्ध मॉडल असून मिस इंडिया २०१७ची फायनालिस्टही आहे. त्याचबरोबर अदिती मिस सुपर नॅचरल इंडिया २०१८ ची विजेती राहिलेली आहे. तसेच आदिती सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करत असते.

दरम्यान, गेल्या २ वर्षांपासून इशान आणि आदिती एकत्र आहे. इशानचे टीम इंडियामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर आदितीने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. अनेकदा इशानची मॅच पाहण्यासाठी आदिती प्रेक्षकांमध्ये बसलेलीही पाहायला मिळाली आहे.

कारकिर्दीतील पहील्याच सामन्याच इशांतने पाडला चौकार षटकारांचा पाऊस
इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या टी20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इशान किशन यानं २८ चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली.

चौकार आणि षटकारांची बरसात करत त्यानं विरोधी संघाच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. षटकाराच्याच सहाय्यानं त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं एकूण ३२ चेंडूंमध्ये ५६ धावांची प्रभावी खेळी करत सर्वांचीच दाद मिळवली.

महत्त्वाच्या बातम्या 

आयुष्याने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले, पण नंतर एका शिक्षकाने तिचे आयुष्य उभारले

…तोपर्यंत स्टेडियममध्ये मॅच बघायला जाणार नाही; इशान किशनच्या आईने केल्या भावना व्यक्त

सचिन वाझेंनंतर ठाण्यातील बड्या नेत्याची होणार चौकशी? राजकीय वर्तूळात उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.