इशान किशनचे दमदार अर्धशतक;  चर्चेत मात्र इशानच्या गर्लफ्रेंडचे हॉट फोटो

अहमदाबाद | भारतीय संघातील युवा खेळाडू इशान किशन यानं रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात पदार्पणाच्याच खेळीत क्रीडारसिकांची मनं जिंकली. टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात मागच्या परभवाचा वचपा काढत इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.

आदिती हुंडई असे इशान किशनच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. आदिती प्रसिद्ध मॉडल असून मिस इंडिया २०१७ची फायनालिस्टही आहे.  त्याचबरोबर अदिती मिस सुपर नॅचरल इंडिया २०१८ ची विजेती राहिलेली आहे. तसेच आदिती सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करत असते.

दरम्यान, गेल्या २ वर्षांपासून इशान आणि आदिती एकत्र आहे. इशानचे टीम इंडियामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर आदितीने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. अनेकदा इशानची मॅच पाहण्यासाठी आदिती प्रेक्षकांमध्ये बसलेलीही पाहायला मिळाली आहे.

कारकिर्दीतील पहील्याच सामन्याच इशांतने  पाडला चौकार षटकारांचा पाऊस
इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या टी20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इशान किशन यानं २८ चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली. चौकार आणि षटकारांची बरसात करत त्यानं विरोधी संघाच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. षटकाराच्याच सहाय्यानं त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं एकूण ३२ चेंडूंमध्ये ५६ धावांची प्रभावी खेळी करत सर्वांचीच दाद मिळवली.

महत्त्वाच्या बातम्या 

नववीची परीक्षा की क्रिकेट? बापाने काळजावर दगड ठेवून घेतलेल्या निर्णयाचं इशानने चीज केलं

‘तु फक्त मुंबईत येऊन भेट, तुझं लग्न मी लावतो’; सलमान खानचा त्या दोन फुटी बुटक्याला शब्द

तो काहीच काम करत नाहीत तरी कमवतो बक्कळ पैसा, सगळ्यांना वाटतो तो हवाहवासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.