इशान किशनने पदार्पणातच इंग्लीश बॉलर्सच्या उडवल्या चिंधड्या; ३२ चेंडूत ५६ धावांची तुफानी खेळी

अहमदाबाद | भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा टी-२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताकडून इशान किशन या युवा फलंदाजाने पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने धावांचा पाऊस पाडला.

आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा सलामी फलंदाज इशान किशन भारतासाठी खेळताना सलामीला उतरला. या सामन्यात षटकारासह इशान किशनने त्याचे पहिले-वहिले अर्धशतक पूर्ण केले.

इशान किशनने त्याच्या पहिल्या सामन्यातच इंग्लीश गोलंदाजांविरुद्ध चांगल्याच धावा चोपल्या. त्याने मैदानाच्या चौफेर चौकार षटकार खेचले. पदार्पणात इशानने ३२ चेंडुमध्ये ५६ धावांची तुफानी खेळी केली.

दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने चांगली धावसंख्या उभारली आहे. पहिल्या षटकात धक्का बसला असला तरी त्यानंतर इंग्लीश फलंदाजांनी चांगली फटकेबाजी करत १६५ धावांचे आव्हान भारतापुढे ठेवले आहे.

महत्वाच्या बातम्या-
विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये पृथ्वी शॉचा झंझावात; ३९ चेंडूत ठोकल्या ७३ धावा
हिटमॅन रोहीतला डच्चू दिल्याने विरेंद्र सेहवाग कोहलीवर भडकला, म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.