भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. ईशानने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक ठोकले आहे. यासह दुहेरी शतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला आहे. त्याला शतक पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीने साथ दिली.
कोहली-इशानच्या खेळीमुळे टीम इंडियाने सामन्यात 8 गडी गमावून 409 धावा केल्या. ईशान आणि कोहलीची ही खेळी बांगलादेशविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात आली. या सामन्यात इशानने द्विशतक पूर्ण करताच मैदानावरच जल्लोषाचे वातावरण सुरू झाले.
कोहलीने भांगडा करत ईशानच्या द्विशतकाचा आनंद चौपट केला. वास्तविक, इशानने द्विशतक पूर्ण करताच, सेलिब्रेशन म्हणून कोहलीने मैदानावरही त्याच्यासोबत भांगडा करायला सुरुवात केली. दोन्ही स्टार खेळाडू मैदानावरच नाचू लागले. ईशान आणि कोहलीचा भांगडा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सर्वप्रथम, हा व्हिडिओ ब्रॉडकास्टर सोनी स्टारने ट्विटरवर शेअर केला आहे. बांगलादेशी गोलंदाजाच्या चेंडूवर ईशान किशनने बचावात्मक शॉट खेळल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते. एक धाव घेतल्यानंतर त्याने आपले द्विशतक पूर्ण केले. यानंतर त्याच्या आनंदाला थारा नव्हता.
दरम्यान, तो कोहलीकडे आल्यावर कोहलीने त्याचे भांगडा करून स्वागत केले आणि त्याला मिठी मारली. या सामन्यात ईशान किशनने 131 चेंडूत 210 धावांची खेळी केली होती. ज्यामध्ये 24 चौकार, 10 षटकारांचा समावेश होता. इशान किशनने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. ज्यामध्ये त्याने 23 चौकार आणि 9 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 160 च्या आसपास होता. ईशान सर्वात जलद द्विशतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा इशान चौथा भारतीय ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनीही ही कामगिरी केली आहे. रोहितने कारकिर्दीत तीन वेळा द्विशतक झळकावले आहे. सर्वाधिक २६४ धावाही रोहितच्या नावावर आहेत.
या सामन्यात इशानशिवाय विराट कोहलीने 91 चेंडूत 113 धावांची खेळी केली. दोघांनी अप्रतिम भागीदारी रचून इतिहास रचला आहे. या सामन्यात इशान आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 290 धावांची भागीदारी केली, जो एक मोठा विक्रम आहे. वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या विकेटसाठी ही चौथी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या
Ajit pawar : तेव्हा खूप बोलत होते आता एसटीचे सरकारमध्ये विलीणीकरण करण्यास कुणी रोखलय? अजित पवारांचा सवाल
मी त्रिशतकही केले असते पण..; द्विशतकानंतर गर्वाने फुगला इशान किशन, ‘या’ खेळाडूला दिले क्रेडीट
aparna tandle : पुण्याच्या ‘कामवाली बाई’चा युट्युबवर राडा, ३० कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिला अन्…