इतके चांगले खेळूनही इशानला ‘या’ गोष्टीचे आहे दु:ख, वाचून तुम्हीही हळहळाल

अहमदाबाद | भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात दुसरा टी -२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. इंग्लंडचा पराभव करत भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. यामध्ये पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात युवा फलंदाज इशान किशनने तुफान खेळी केली आहे.

इशान किशनने ३२ चेंडुमध्ये ५६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ४ षटकार आणि ५ चौकार ठोकले आहेत. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात इशानने धावांचा पाऊस पाडल्याने कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनी तोंडभरून कौतुक केले आहे. उत्कृष्ट कामगिरी करून क्रिकेटप्रेमींचे मन जिंकण्याबरोबरचं इशानने त्याच्या कृतीतूनही चाहत्यांवर छाप पाडली आहे.

इशानला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर इशान किशन भावूक झाला आहे. इशान किशनच्या कोचच्या वडिलांचं निधन झालं आहे. कोचने इशानकडे पहिल्या सामन्यात अर्धशतक तरी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. इशानने कोचची अपेक्षा पुर्ण केली आहे. त्यामुळे त्याने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांना अर्पण केला आहे. यातूनच इशान किशन किती मोठ्या मनाचा माणूस आहे हे दिसून येत आहे.

इशान किशन म्हणाला की, “मला मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये वरिष्ठ खेळाडूंकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. अखेर मला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसमोर खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात मला शेवटपर्यंत टिकून राहायचं होतं.

दरम्यान पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात इशानने ५६ धावा केल्या आहेत. त्यामूळे टी -२० सामन्यामध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इशान किशन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

इशान किशन हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये इशान किशनने झारखंडकडून खेळत चांगली कामगिरी केली आहे. झारखंड संघाचा इशान किशन कर्णधार आहे.
महत्वाच्या बातम्या-
२००० रुपयांच्या नोटांबद्दल मोदी सरकारचा खुलासा, वाचा धक्कादायक माहिती
आधी देशात लस उपलब्ध करुन द्या, मग परदेशात पाठवून नाव कमवा; हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारले
आता खरी विकेट पडली! जसप्रित अडकला लग्नबेडीत, पहा लग्नाचे खास व्हायरल फोटो
इशान किशनने त्याच्या तुफानी खेळीचे सांगितले ‘हे’ रहस्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.