चाहत्यांना धक्का, इशान किशन आणि सुर्यकुमार मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाहीत

अहमदाबाद | भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात दुसरा टी-२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. इंग्लंडचा पराभव करत भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. युवा फलंदाज इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पण केले आहे. इशान किशनने तुफान खेळी करत इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे. मात्र या सामन्यात सुर्यकुमार यादवला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंग्लंडच्या मोठ्या खेळाडूं विरोधात चमक दाखवण्याची संधी मिळाल्याने इशान किशन आणि सुर्यकुमार चांगलेच खुश होते. मात्र टी-२० मालिका सुरू असतानाच मुंबई इंडियन्सने दोघांना धक्का दिला आहे.

आयपीएलमध्ये सुर्यकुमार आणि इशान किशन मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. आयपीएल स्पर्धेच्या ऑक्शन नियमानुसार, तीन खेळाडूंना फ्रँचायची संघात काम करू शकते. RTM नियमानुसार एक परदेशी आणि एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला खेळाडू कायम ठेवू शकतात. त्यामूळे मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्याला कायम ठेवतील. म्हणून सुर्यकुमार यादव आणि इशान किशनला संघातून बाद होण्याची वेळ येऊ शकते.

आयपीएल 2022 मध्ये दोन नवीन संघ सामील होणार आहेत. त्याचा ऑक्शन यावर्षीच्या अखेरीस पार पडण्याची शक्यता आहे. या दोघांना संघात कायम ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला मोठी बोली लावावी लागणार आहे. कारण दोन नवीन संघ दाखल होणार असल्याने त्यांना सुर्यकुमार आणि इशान किशनवर बोली लावता येणार आहे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये इशान किशनने झारखंडकडून खेळत धुवादार बॅटींग केली होती. झारखंड संघाचा इशान किशन कर्णधार आहे. आयपीएलमध्ये इशानने मुंबई इंडियन्सकडून खेळत धमाकेदार कामगिरी केली आहे. इशानने आयपीएलच्या १३व्या मोसमात ५१६ धावा केल्या आहेत.

सुर्यकुमार यादववर मुंबई इंडियन्सने अनेकवेळा बोली लावली आहे. तसेच कोलकत्ता नाईट रायडर संघामध्येही तो खेळला आहे. आयपीएलच्या १०१ सामन्यांमध्ये सुर्यकुमारने ८६ डावांत फलंदाजी करत २०२४ धावा काढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल ऑक्शनमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या शाहरूख खानबद्दल १० गोष्टी
IPL, सचिन वाझे, १५० कोटींची खंडणी; भाजप आमदाराचे एका मागोमाग एक गौप्यस्फोट
आता खरी विकेट पडली! जसप्रित अडकला लग्नबेडीत, पहा लग्नाचे खास व्हायरल फोटो
इंग्लंडवरील दणदणीत विजयानंतर पदार्पण करणाऱ्या सुर्यकुमारने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाला….

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.