कपडे काढ मला तुझे पुर्ण शरीर बघायचे आहे; कास्टिंग काऊचबद्दल अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूडच्या ग्लॅमसर दुनियेत कास्टिंग काऊच हा प्रकार काही नवा नाही. चित्रपटात काम देण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते, कास्टिंग डायरेक्टर, डायरेक्टर अभिनेत्रींकडून वेगवेगळ्या मागण्या करत असतात. आता पर्यंत अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचबद्दल खुलासे केले आहे.

आता असाच एक खुलासा अभिनेत्री इशा अग्रवालने केला आहे. एका चित्रपटात रोल देण्यासाठी तिच्याकडे एका कास्टिंग डायरेक्टरने कोणती मागणी केली होती. याबाबत तिने खुलासा केला असून तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव तिने सांगितला आहे.

मी एक रोल मिळवण्यासाठी एका कास्टिंग डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये गेले होते. त्यावेळी त्याने रोल मिळवण्यासाठी तुझे शरीर पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीरावरचे पुर्ण कपडे काढण्याची मागणी केली होती, असा धक्कादायक खुलासा इशाने केला आहे.

इशाने स्पॉटबॉयला एक मुलाखल दिली होती. त्यावेळी ती म्हणाली, कास्टिंग काऊच ही एक वस्तुस्थिती आहे. जेव्हा मी मुंबईत नवीन आले होते, तेव्हा एका प्रख्यात कास्टिंग व्यक्तीने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले होते. तिथे मी माझ्या बहिणीसोबत गेली होती.

त्या डायरेक्टरने अनेक मोठ्या कलाकारांना कास्ट केल्याचा दावा केला होता. तसेच मलाही चित्रपटात कास्ट करेल असा तो म्हणाला. पुढे अचानक त्याने मला पुर्ण कपडे काढण्यास सांगितले. रोल देण्यासाठी शरीर पाहण्याची गरज आहे, असे तो म्हणू लागला. मी त्याला लगेच नकार दिला आणि माझ्या बहिणीला घेऊन त्या ऑफिसमधून बाहेर पडले, असा अनुभव इशाने कास्टिंग काऊचबद्दल सांगितला आहे.

तसेच इशाने नवीन आलेल्या कलाकारांना सल्लाही दिला आहे. अनेक कास्टिंग डायरेक्टर कंपन्यांसोबत काम केल्याचा दावा करत असतात. पण त्यांच्यापासून सावध रहा, असे इशाने म्हटले आहे.

तसेच ते आपल्याला चित्रपच ऑफर करुन अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. पण जिथे तुमच्या टॅलेंटला महत्व आहे, जिथे कोणत्याही अटी नाही. तिच जागा तुम्ही शोधायला हवी, असेही इशाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मधूचंद्राच्या दिवशीच ताप आला अन् नवरदेवाचा झाला मृत्यु; नवरीचा संसार झाला काही तासातच उध्वस्त
इंडियन आयडलमध्ये बापाविना दिसणार सायली कांबळे, तिने सांगीतलेले कारण ऐकून तुम्हालाही येईल रडू
लग्नाच्या दिवशी नवरीला आला नवरदेवाचा मॅसेज; मॅसेज वाचून नवरीचे अख्खे कुटुंबच हादरले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.