Share

तुमच्या स्मार्टफोनचा इंटरनेट स्पिड स्लो आहे का? ‘या’ खास ट्रिक्स वापरा अन् वाढवा तुफान स्पिड

सध्या इंटरनेट आणि स्मार्टफोन हे फार महत्वाचे झाले आहेत. सध्या लोकांना कोणतंही काम करण्यासाठी इंटरनेटची गरज लागते. ऑफिसचं काम करण्यासाठी किंवा ऑनलाईन फूड डिलिव्हरी अँपवरून जेवण मागविण्यासाठी आता चांगल्या इंटरनेट स्पीडची आवश्यकता असते. आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोनमधील(Smartphone) इंटरनेट स्पीड वाढविण्यासाठी काही ट्रिक्स सांगणार आहोत.(Is your smartphone internet speed slow? use this tricks)

ज्यावेळी आपला स्मार्टफोन स्लो नेटवर्क असलेले बॅण्डविड्थ पकडू लागतो, त्यावेळी आपल्या स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड कमी होतो. आपल्या स्मार्टफोन सेटिंग्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅण्डविड्थ नेटवर्क असतात. 3G, 4G आणि LTE हे बॅण्डविड्थ नेटवर्क आपल्या स्मार्टफोनमध्ये असतात. यातील योग्य पर्याय निवडून आपण आपल्याला पाहिजे असेल ते इंटरनेट स्पीड मिळवू शकतो.

काही ठिकाणी इंटरनेट स्पीड कमी असते. त्यावेळी तुमचा फोन आपोआप स्लो बॅण्डविड्थवर स्विच होतो. तुम्ही नेहमी इंटरनेटशी कनेक्ट असावं म्हणून तुमचा फोन आपोआप स्लो बॅण्डविड्थवर स्विच होतो. पण काही वेळा तुम्ही परत रेंजमध्ये आल्यानंतर तुमचा स्मार्टफोन जास्त स्पीड देणाऱ्या बॅण्डविड्थवर स्विच होतं नाही.

त्यावेळी वेगवान स्पीड मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील सेटिंग्समध्ये जाऊन बदल करणे आवश्यक असते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमधील सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर ‘नेटवर्क ऑपरेटर’ हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला ‘Choose Automatically’ नावाच्या पर्यायावर क्लिक करावं लागेल.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही नेटवर्क प्रोव्हायडरची लिस्ट येते. या लिस्टमधून तुम्हाला तुमच्या टेलिकॉम कंपनीचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनची सेटिंग्स बंद करावी लागेल आणि पुन्हा एकदा तुमचा फोन रिस्टार्ट करावा लागेल. त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड वाढलेला असेल.

या पर्यायाचा वापर तुम्ही कुठेही करू शकता. सहसा ग्रामीण भागात इंटरनेट स्पीड कमी असते. त्या ठिकाणी या पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचे इंटरनेट स्पीड वाढवू शकता. इंटरनेट स्पीड वाढल्यास तुम्हाला फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करण्यास त्रास होणार नाही. या पर्यायामुळे तुमच्या इंटरनेट स्पीडला देखील वेग येईल.

महत्वाच्या बातम्या :-
छगन भुजबळांकडून राज ठाकरेंच्या इतिहासाचा पंचनामा; ‘…तेव्हा टिळक 13 वर्षाचे होते’
मशिदींवरील भोंगे उतविण्याने हिंदुत्वाचे सर्वाधिक नुकसान होईल; ब्राह्मण महासंघ आक्रमक
मनसेची अनपेक्षीत माघार! स्वत: राज ठाकरेंनीच जाहीर केला निर्णय; म्हणाले मुस्लिम समाजाचा…

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now