तुमचा गॅस बर्नर काळा किंवा खराब झाला आहे? जाणून घ्या साफ करण्याची घरगुती पद्धत

आपण बऱ्याच गोष्टी वापरतो. विशेषतः महिला घरातल्या बऱ्याच गोष्टी वापरतात. मग ती कुठलीही असो. त्यातल्या काही वस्तू ह्या दैनंदिन वापरातल्या असतात. त्या गोष्टी वापरल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही.

परंतु या गोष्टींची आज आपल्याला खूप गरज आहे. त्यामुळे त्या गोष्टी खूप जपाव्या लागतात. जेणेकरून त्या ठीकठाक राहतील. त्यातला काही गोष्टी खूप महागड्या असतात. पण काही गोष्टी अश्या पण असतात ज्या खराब झाल्या तर आपल्याला कोणत्याही अनुसूचित घटनेला सामोरे जाऊ लागू शकते.

विशेषतः अशी काही उपकरणे जी खराब झाली तर आज लागण्याची शक्यता असते. असेच एक उपकरण म्हणजे आपला गॅस स्टोव्ह. पण त्यात समस्या असते ती गॅस बर्नरची. स्वयंपाक घरातील जवळजवळ सगळ्या वस्तू साफ करता येतात पण गॅस बर्नर साफ करता येत नाही. त्याच्यात जर घाण वगैरे गेली तर गॅस बर्नर खराब होतो किंवा त्याच्यातून गॅसचा प्रवाह कमी होतो.

त्यासाठी आपण गॅस नीट करणाऱ्या माणसाला बोलावतो. पण या काळ्या झालेल्या बर्नरांना दोन सोप्या घरगुती पद्धतीने घरीच स्वच्छ आणि नवीन बर्नर सारखे चमकदार केले जाऊ शकते. चला त्या पद्धती जाणून घेऊया.

१) एक कटोरी व्हिनेगर घ्या. त्यामध्ये एक कप पाणी टाका. आता यामध्ये बर्नर चांगले धुवून घ्या. त्यानंतर दोन्ही बर्नर यामध्ये रात्रभर बुडवून ठेवा. सकाळी बर्नर ब्रशच्या साहाय्याने घासून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने घासून घ्या.

२) लॉकडाऊनमध्ये अनेक जणांनी ENO चा वापर अनेक खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला आहे. पण याच ENO ने आपण गॅस बर्नर स्वच्छ करू शकतो. काळे झालेले गॅस बर्नर एकदम नवीन असल्यासारखे दिसतील.

भांड्यात गरम पाणी घ्या. त्या भांड्यात ENO चे एक किंवा अर्धे पाकीट टाका. त्यामध्ये गॅस बर्नर टाका. २-३ मिनिटांनी गॅस बर्नर बाहेर काढा. त्यानंतर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. आता ते थंड पाण्याने धुवून काढा. नंतर कापडाने पुसून घ्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.