Sanjay Shirsat : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नाव न आल्याने अनेक नेते नाराज होते. यात प्रामुख्याने शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांचेही नाव होते. मात्र, आपण नाराज नसून मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात आपले नाव असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ज्यांनी पहिल्यांदा या उठावात साथ दिली त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात स्थान देण्यात आले आहे. लवकरच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात माझे नाव असणार आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
तसेच, उद्धव ठाकरे सरकारमध्येदेखील पहिल्या यादीत माझे नाव होते, परंतु ऐनवेळी ते का कापले मी त्यांना विचारू शकत नाही. मात्र, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मी राहणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे. या यादीतही माझं नाव होतं, पण काही कारणं असतील. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मी मंत्रिपदावर दिसेन, कुठेही टेन्शन नाही, असेही आमदार संजय शिरसाट म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि मंगलप्रभात लोढा या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.
यामध्ये संजय शिरसाट यांचे नाव नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपले नाव राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
‘ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करणार’; भाजप नेत्याने केली गर्जना
शिंदे गटातील ‘या’ बड्या आमदाराने उद्धव ठाकरेंना म्हटले कुटुंबप्रमुख; परत येण्याचे दिले संकेत?
Uddhav Thackeray : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आखला ‘हा’ मास्टर प्लॅन; माजी नगरसेवकांची भेट घेऊन म्हणाले…
आशिष शेलार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आता मुंबईचा महापौर हा भाजपचाच असणार