राजकारणात साधे राहणे गुन्हा आहे का? विजय रूपाणींच्या मुलीचा मोदींवर थेट निशाना

नवी दिल्ली। भाजप नेते विजय रुपाणी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात पडली आहे. भूपेंद्र पटेल यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली आहे. आता भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री आहेत. विजय रूपाणी यांनी शनिवारी अचानक गुजरातच्या सीएम पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर आज नवीन नाव निवडण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी दुपारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली.

मात्र आता रुपाणींचा राजीनामा आणि भुपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केल्याने काही नेते नाराज असल्याची चर्चाही सुरु आहे. विजय रुपाणी यांच्या मुलीने फेसबुक पोस्टमधून भाजपला सुनावलं आहे. विजय रुपाणी यांची मुलगी राधिका रुपाणी यांनी आपल्या भावना व नाराजी व्यक्त केली आहे.

राधिका रूपाणीने तिच्या वडिलांविषयी फेसबुकवर गुजराती भाषेत एक दीर्घ पोस्ट लिहिली. यामध्ये तिने वडील विजय रुपाणी यांचे काम आणि घरातील वातावरणाबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. पोस्टमध्ये म्हटलं की, ‘२००२ मध्ये जेव्हा अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला होता तेव्हा मोदींच्या आधी माझे बाबा तिथं पोहोचले होते.’ फेसबुक पोस्ट लिहिताना ‘एका मुलीच्या नजरेतून विजय रुपाणी’ अशी सुरुवात त्यांनी आहे.

राधिका यांनी लिहिलं की, खूप कमी लोकांना माहिती आहे की, कोरोना आणि तौक्ते चक्रीवादळाच्या आपत्तीत माझे बाबा मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत जागे रहायचे आणि लोकांच्या समस्या सोडवायचे. त्यासाठी सतत फोनवरून ते संपर्कात राहत होते. माझ्या वडिलांचा प्रवास हा एक कार्यकर्ता म्हणून सुरु झाला आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचला.

पुढे त्या म्हणाल्या, माझ्या वडिलांची सुरुवात तर १९७९ च्या मोरबी पूर, अमरेली ढगफुटी, कच्छ भूकंप, स्वामीनारायण मंदिरावर दहशतवादी हल्ला, गोध्राची घटना, बनासकांठा महापूर यापासून झाली. माझे बाबा नेहमी सांगतात की राजकारण आणि नेत्यांची प्रतिमा चित्रपट आणि आधीपासूनच्या समजुतीच्या प्रभावाने तयार झाली आहे. ती बदलायला हवी.

रुपाणींनी कधीच गटबाजीचे समर्थन केले नाही आणि तेच त्यांचे वैशिष्ठ्य होते. काही राजकीय विश्लेषक विचार करत असतील की विजयभाईंच्या कारकिर्दीचा हा शेवट आहे. पण खरंतर विरोधापेक्षा आरएसएस आणि भाजपच्या सिद्धांतानुसार सत्ता कोणत्याही लालसेशिवाय सोडणं चांगलं आहे असेही राधिका यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“आम्हाला शिकवले गेले आहे की कोणतीही व्यक्ती कधीही घरात येऊ नये आणि वडील नसल्यास त्याला चहा आणि नाश्त्याशिवाय बाहेर जाऊ देऊ नये. नेहमी साधा स्वभाव ठेवा. आज आपण आपल्या क्षेत्रात स्थिरावण्यास सक्षम आहोत आणि नम्र आहोत, त्यामुळे याचे श्रेय आपल्या पालकांना जाते.

राधिका म्हणाल्या की, आम्हाला ते फिरायला घेऊन जात नव्हते. चित्रपट पाहण्यासाठी न नेता ते एखाद्या कार्यकर्त्याकडे घेऊन जायचे. जेव्हा स्वामी नारायण अक्षरधाम मंदिरावर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा तिथं पोहचणारी पहिली व्यक्ती माझे बाबा होते. नरेंद्र मोदींच्या आधी ते मंदिर परिसरात पोहोचले होते. बाबांचा स्वभाव शांत आणि मितभाषी आहे आणि त्यामुळेच त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण झाली.

राजकीय नेत्यांनी संवेदनशील असू नये का? नेत्यांमध्ये असा गुण असायला नको का? त्यांनी कठोर पावलं उचलली आहेत. जमीनीसाठीचा कायदा असेल, लव्ह जिहाद असेल किंवा गुजरातमध्ये दहशतवाद नियंत्रणासाठीचे निर्णय असतील. त्यांच्या कठोर निर्णयाची ही उदाहरणे आहेत असे म्हणत त्यांच्या मितभाषी स्वभाववर टीका करणाऱ्यांना राधिका यांनी उत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
राज ठाकरे यांचा ‘तो’ मुद्दा मुख्यमंत्र्यांना पटला! गृहविभागाला दिले तातडीचे आदेश…
‘सरकारचा प्रचार करणारे सिनेमा बनवायला सांगीतलं जातय, नाझी जर्मनीत असंच व्हायचं”
“बचपन का प्यार” गाणे म्हणत १३ महाभाग बसले एका दुचाकीवर, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी धरले धारेवर 
…म्हणून जावयाने सासुचे गुप्तांग दगडाने ठेचले; मुंबईतील भयानक घटनेने महाराष्ट्र हादरला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.