इरफान खानला झाला होता मृत्यूचा पुर्वाआभास; मुलाने केला खुलासा

बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते इरफानच्या मृत्यूला एक वर्ष पुर्ण झाले आहे. गेल्या वर्षी २९ एप्रिलला इरफान खान हे जग सोडून गेले होते. त्यांच्या मृत्यूने सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला होता.

इरफानच्या जाण्याचे इंडस्ट्रीचे खुप मोठे नुकसान झाले आहे. पण सर्वात जास्त नुकसान झाले ते म्हणजे त्यांच्या कुटूंबाचे. इरफान खानचा मुलगा बाबिल नेहमी सोशल मिडीयावर त्याच्या वडीलांसंबंधी फोटो आणि आठवणी शेअर करत असतो.

वडीलांच्या मत्यूला वर्ष पुर्ण झाल्यानंतर बाबिल त्या दुखातून सावरलेला नाही. त्यासोबतच त्याचा चाहता वर्ग देखील अजून दुखी आहे. काही दिवसांपूर्वीच इरफान खानचा मुलगा बाबिलने मिडीयाला एक मुलाखत दिली होती. त्यात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

सर्वात मोठा खुलासा म्हणजे बाबिलने सांगितले की इरफानला त्यांच्या मत्यूबद्दल अगोदरच समजले होते. बाबिलच्या या खुलास्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पण बाबिलने ही गोष्ट खरी असल्याचे सांगितले. त्यावेळी वडीलांच्या जाण्याने त्याला काहीही सुचत नव्हते. त्यामूळे त्याने या गोष्टीचा खुलासा केला नव्हता.

इरफान खान त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये खुप आजारी होते. त्यामूळे त्यांना कोकिला बेन हॉस्पिटलमध्ये ऑडमिट करण्यात आले होते. बाबिलने सांगितले की, ते हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे बघितले आणि मला बोलले मी मरणार आहे.

त्यावेळी मी त्यांना सांगितले की, ‘तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही लवकरच नीट व्हाल आणि घर याल. माझे बोलणे ऐकून ते हसले आणि परत एकदा झोपी गेले’. इरफान खानला वाचवता आले नाही. २९ एप्रिल २०२० ला त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

इरफान खान आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे चित्रपट आणि अभिनय नेहमी आपल्यासोबत असणार आहेत. इरफान खानने १९८६ मध्ये सलाम बॉम्बे चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी चित्रपटांमध्ये अनेक छोट्या भुमिका केल्या.

मकबूल चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. इरफान खानने ब़ॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर कधीच मागे वळून पाहीले नाही. त्यांनी छोट्या छोट्या भुमिका करुन यश मिळवले. त्यांच्या अभिनयाने त्यांना स्टार बनवले. इरफान खानने बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्ये देखील काम केले.

महत्वाच्या बातम्या –

…म्हणून विनोद खन्नाने मुकेश भट्टच्या दणादण कानाखाली वाजवल्या होत्या
शाहरुख खानने माझ्या आयुष्याची वाट लावली; तरुणीचा शाहरुख खानवर खळबळजनक आरोप
रोज सेटवर येऊन बसायची हेमामालिनीची आई; फिरोज खानला एकही रोमॅंटीक सीन करू दिला नाही
जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.