मृत्यू येणार हे इरफान खानला आधीच कळले होते; शेवटच्या क्षणी पोराला म्हणाले असे काही की, तुम्हालाही रडू कोसळेल

बॉलीवूड दुनियेत असे अनेक अभिनेते होऊन गेलेत की, ज्यांना विसरन शक्य नाही. त्यांच्या अभिनयाने आणि साध्या सरळ स्वभावाने प्रेक्षकांना भुरळ पडलेली असते. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे इरफान खान. त्यांच्या मृत्यूला १ वर्ष पूर्ण होऊन गेले, गेल्या वर्षी २९ एप्रिल २०२० रोजी इरफान खान यांचे निधन झाले होते.

इरफान खान यांचा मुलगा बाबील खानने त्यांच्या डेथ एनिवर्सरीच्या दिवशी काही गोष्टींचा खुलासा केला. त्याने सांगितले की, इरफान खान यांना माहित होते की त्यांचा शेवट जवळ आला आहे. इरफान यांना २ वर्षापासून न्युरो डोक्रीन ट्युमरचा त्रास होता. त्यांच्यावर उपचारही चालू होते, परंतु म्हणतात ना माणसाचा शेवट आला की त्याला समजत किवा एखाद्या गोष्टीची जाणीव होते, इरफान खान यांच्या बाबतीत असेच घडले.

बाबीलने सांगितले की , सुरुवातीच्या काही दिवसांत माझी इकडे तिकडे धावपळ चालू होती. घरी आणि हॉस्पिटल मध्ये  सर्व काही ठीक आहे की नाही याची खात्री करुन घेत होतो. हे दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. मला हे चांगले आठवते जेव्हा डॉक्टर कॅथेटर घालणार होते. तेव्हा त्यांनी मला खोलीबाहेर जाण्यास सांगितले, त्यानंतर पप्पा खूप जोरात कळवलेले बाबील तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस! त्या दिवसाआधी मला इतक्या वेदना कधीच झाल्या नव्हत्या.

बाबीलने सांगितले की मृत्युच्या २-३ दिवस आधी ते आपले देहभान गमवताना  दिसत होते, त्यातच त्यांनी बाबीलकडे पहिले आणि हसत म्हणाले, ‘मी मरणार आहे’ त्यांच्या या वाक्यावर तुम्हाला काही होणार नाही असे बाबील म्हणाला. त्यांच्या या वाक्याने बाबील मात्र पूर्ण खचून गेले.

मुलाखतीत हजर असलेल्या इरफान खान यांच्या पत्नी सुतापा यांनी आपल्या नवऱ्याविषयी सागताना बोलल्या की, ते कधीही खोट बोलत नसत. तसेच त्यांचा उत्तम गुण म्हणजे ते कोणत्याही गोष्टींचा दिखावा करत नसत. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा त्यांच्या कुटुंबियांना आवडत होता.

बाबील लवकरच अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाउसमधून डेकरण्ब्यूयास सज्ज झाला आहे. या चित्रपटात बाबीलसोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. इरफान यांचे चाहते बाबिलच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे ही वाचा-

अरे हाड..आम्ही प्रश्न विचारणार, सत्तेतल्या प्रत्येकाला; मराठमोळा अभिनेता राजकारण्यांवर संतापला

लष्करातील मेजर ते प्रसिद्ध अभिनेते असा झंझावाती प्रवास करणारे विक्रमजीत कंवरपालांचे कोरोनाने निधन

पंड्या बंधूंचे कौतूकास्पद काम; देशातील ग्रामीण भागासाठी दिले तब्बल २०० ऑक्सिजन संच

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.