‘या’ कंपनीकडून वाहन विमा घेऊ नका, IRDAI चा सावधगिरीचा इशारा

मुंबई | विमा नियामक इंन्शुरेन्स रेगुलेटरी अ‍ॅड डेवलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया(IRDAI) कडून वाहन विमा देणाऱ्या एका कंपनीबद्दल सर्वांसाठी इशारा जारी करण्यात आला आहे. या विमा कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी IRDAI ने याबाबतची जाहीर नोटीस बजावली आहे. संबंधित कंपनीला विमा पॉलिसी विकायला कोणताही परवाना देण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे.

११ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलेल्या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे की #DNMI co.ltd पोर्टल ऑफिस. कृष्णा राजा पुरम, इन्शुरेन्स इंफो बिल्डिंग, देवसंदरा, बंगळुरू-५६००३६ येथून डिजिटल नॅशनल मोटार इंन्शुरेन्स नावाची कंपनी विमा विक्री करत आहे. ही कंपनी बनावट विमा पॉलिसी विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कंपनीला विमा पॉलिसी विकायला मान्यता नसल्याचे आयआरडीएआयने म्हटले आहे.

या कंपनीला आयआरडीएआयने इशारा देऊन नोटीस बजावली होती. तसेच ग्राहकांना सावधगिरी बाळगण्यासाठी आवाहन केले होते. संबंधित कंपनीच्या फसवणूकीत कोणीही अडकू नये असे आयआरडीएआयकडून सांगण्यात आले आहे. तसेच विमा पॉलिसी विकायला परवाना नसलेल्या या कंपनीला नोंदणी अनुदान मिळाले नाही.

आयआरडीएने नोटीसमध्ये संबंधित कंपनीचा ईमेल आयडी आणि वेबसाइटचाही उल्लेख केला आहे. यानुसार [email protected]  आणि https: //dnmins.wixsite.com/dnmins या वेबसाइट आणि ईमेलपासून दूर राहण्यास सांगितले आहे. या कंपनीने तिच्या वेबसाइटवर स्वत:बद्दल लिहिले आहे की ती कार, बाइक, बस आणि ऑटोसाठी विमा संरक्षण पुरवते. मात्र ही कंपनी बनावट असून तिच्या फसवणूकीचे बळी न पडण्याचे आवाहन आयआरडीएने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…
दमदार आणि आकर्षक लूकमध्ये महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत आहे फक्त
शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल…
रोहित पवारांच्या नगरच्या सभेची महाराष्ट्रभर चर्चा का? वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.