मी १४ वर्षांची असताना माझ्यावर…; आमिर खानच्या मुलीचा खळबळजनक गौप्यस्फोट

बई | अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सध्या खूप चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती सतत काहीना काही पोस्ट करत असते. नुकताच जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन पार पडला.

त्यावेळेसही तिने एक व्हीडिओ शेअर केली होती. त्यामध्ये तिने सांगितले की, ती देखील नैराश्याच्या काळातून गेली आहे. परंतु आमिर खानची मुलगी इरा खान नैराश्यात का होती? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

अनेकांनी कॉमेंटमध्ये तिला हा प्रश्न विचारला त्याचे उत्तर तिने दिले आहे. तिने खुलासा केला आहे की, १४ वर्षांची असताना माझ्यावर लैं गिक अ त्याचार झाला होता. या खुलाष्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे. ती म्हणाली मी खूप लहान होते तेव्हा माझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. पण घटस्फोट झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये खूप चांगले मैत्री संबंध होते. त्यांनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या.

परंतु एका घटनेने माझ्यावर खूप खोलवर परिणाम केला. मी सहा वर्षांची होते तेव्हा मला टीबी झाला होता. मी १४ वर्षांची असताना माझ्यावर लै गिक अ त्याचार झाले होते. अशा अनेक घटनांनी माझ्या मनावर परिणाम केला होता. मी माझ्या मित्रांसोबत बाहेर जाणे टाळायचे.

मी बराच वेळ घरीच झोपून काढायचे. हळूहळू मी स्वतःला एकटी समजू लागले. आणि मला मी डिप्रेशनमध्ये असल्याची जाणीव झाली. असा अनुभव तिने शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिने हा व्हिडिओ आपल्या युट्युब चॅनेलवर हिंदीमध्ये ट्रान्सलेट करूनसुद्धा टाकला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.