आमिरची मुलगी पडली फिटनेस ट्रेनरच्या प्रेमात, व्हॅलेंटाईन दिवसातच केला धक्कादायक खुलासा

प्रेमाच्या आठवड्यात प्रेमी आपलं प्रेम जोडीदाराकडे व्यक्त करत असतात. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान करताना दिसत आहे. इराने तिचा आणि आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरसोबत रिलेशनशीप जवळजवळ स्विकारलीच आहे.

इरा आणि नुपूर गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. परंतु प्रेमाच्या या आठवड्यात तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये इराने दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसते आहे. फोटो आणि त्यांना दिलेल्या कॅप्शनमुळे हे स्पष्ट झाले आहे.

आमिर खानच्या मुलगी इराने प्रॉमिस डेला नुपूरसोबतचे फोटो पोस्ट केले यासाठी ‘माय व्हॅलेंटाईन’ हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच कॅप्शन देताना तिने लिहिले आहे की, ‘तुझ्यासोबत राहणं आणि तुला वचन देणं अभिमानाची गोष्ट आहे’. तर या पोस्टवर नुपूरने उत्तर दिले आहे तो तिला सरळ ‘आय लव यू’ म्हणाला आहे.

दरम्यान, नुपूर शिखर हा सेलिब्रेटी फिटनेस कोच आहे. तो इरा खानसह अमिर खान, सुष्मिता सेन यांना ट्रेनिंग देतो आहे. इरा आणि नुपूर कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यान ऐकमेकांच्या अधिक जवळ आले आहेत. दोघांनी एकत्र आमिर खानच्या महाबळेश्वर येथील फार्म हाऊसवर सुट्ट्या घालवल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-
शमिता शेट्टीच्या ‘या’ एका चुकीमूळे तिचे करिअर झाले होते फ्लॉप; आज करते पश्चाताप
अभिनेत्री राजेश्वरी खरातचा बेडवर ग्लॅमरस फोटोशूट; फोटो पाहून चाहते झाले घायाळ
आयपीएलमध्ये घेतलेल्या अर्जून तेंडूलकरला मुंबईच्या टिममधून दिला डच्चू
अभिनेत्री राजेश्वरी खरातचा बेडवर ग्लॅमरस फोटोशूट; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.