Share

IPS Officer Suicide : IPS अधिकाऱ्याची आत्महत्या; IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना अधिकाऱ्याने डोक्यात झाडली गोळी

IPS Officer Suicide :  हरियाणा (Haryana) कॅडरमधील वरिष्ठ पोलिस अधिकारी वाय. पूरण कुमार (Y Puran Kumar) यांनी स्वतःच्या सरकारी निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना चंदीगड (Chandigarh) येथे उघडकीस आली आहे. ही घटना सेक्टर 11 मधील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी घडली. ते हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP Rank Officer) म्हणून कार्यरत होते.

या घटनेने प्रशासनात खळबळ माजली असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक चौकशीनुसार, अधिकाऱ्यांनी स्वतःच्या पिस्तूलने (Pistol) डोक्यात गोळी झाडून घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना घटनेचा धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, वाय. पूरण कुमार यांच्या पत्नी या भारतीय प्रशासन सेवेतील (IAS Officer) अधिकारी असून त्या सध्या हरियाणाचे मुख्यमंत्री (Chief Minister) यांच्यासोबत अधिकृत जपान (Japan) दौऱ्यावर होत्या. दरम्यान, त्यांच्या अनुपस्थितीत ही दुर्दैवी घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

मुलीने पाहिला रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह

मंगळवारी दुपारी अधिकाऱ्यांची मुलगी घराच्या बेसमेंटमध्ये (Basement) गेली असता तिला वडिलांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. तीने तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी चंदीगड पोलिस (Chandigarh Police) आणि फॉरेन्सिक टीम (CFSL Team) दाखल झाली. पोलिसांनी ठिकाणाची पाहणी करून पुरावे जप्त केले. मृतदेह सेक्टर 16 (Sector 16) येथील सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

वाय. पूरण कुमार यांची कारकीर्द

वाय. पूरण कुमार हे 2010 बॅचचे IPS अधिकारी (2010 Batch IPS Officer) होते. त्यांच्या प्रामाणिक कामगिरीमुळे ते हरियाणा पोलिस दलातील अत्यंत कुशल आणि कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जात होते. सध्या ते रोहतक (Rohtak) जिल्ह्यातील सुनारिया पोलिस ट्रेनिंग कॉलेजमध्ये (Police Training College Sunaria) नियुक्त होते.

त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की, पूरण कुमार हे शांत, जबाबदार आणि कार्यक्षम अधिकारी होते. आत्महत्येच्या घटनेमागे वैयक्तिक किंवा मानसिक कारण असावं, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, पोलिस तपास सुरू असून सत्य लवकरच समोर येईल.

या घटनेनंतर हरियाणा पोलीस आणि चंदीगड पोलीस मिळून तपास करत आहेत. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळली नाही. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या मोबाईल आणि वैयक्तिक कागदपत्रांचीही तपासणी सुरू आहे.

 

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now