नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणारे IPS दीपक पांडे पुन्हा चर्चेत, गोदास्नानात झाले मग्न..

नाशिक । मूळचे बिहार राज्यात गंगा नदी किनारी राहणाऱ्या दीपक पांडे यांची नाशिकला बदली झाली. येथे आल्यावर दक्षिण गंगा म्हणून ओळख असणाऱ्या गोदामाईच्या दिशेने ते आकर्षित झाले. आणि ते रोज या नदीला भेट देऊ लागले. काही महिन्यांपासून दीपक पांडे आणि त्यांचे ९० वर्षीय पिता शिवानंद पांडे रोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावर गोदापत्रात स्नान करतात.

यामुळे आता त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांना हे फोटो बघून विश्वास बसत नाही. रोज खाकी वर्दीत गुन्हेगारीचा बिमोड करणाऱ्या नाशिकच्या पोलीस आयुक्तांचे असे नव रुप नाशिककरांना बघायला मिळाले आहे. रोज ते गोदावरी नदीत स्नान करतात. अनेकजण त्यांना बघून आश्चर्य व्यक्त करतात.

ते सांगतात, गोदावरी स्नानामागे धार्मिकता नाही तर शास्त्र आहे. पंचमहाभूते स्नान इथे घडते. शरीरासाठी जल, वायू, सूर्यप्रकाश आवश्यक असल्याने जल चिकित्सा करण्यासाठी मी इथे येतो. आणि येथे स्नान करतात. आयपीएस अधिकारी झाल्यानंतर कधी नदीकाठी पोस्टिंग झाली नव्हती.

त्यामुळे येथे येईपर्यंत नदीस्नान करण्याचा योग आला नाही, वडील अनेक वर्षांपासून गंगा स्नान करतात त्यामुळे इथे ते माझे गुरू आणि मी त्यांचा शिष्य असल्याचे दीपक पांडे सांगतात. अनेक वर्षांपासून त्यांना सवय झाली आहे. स्वच्छ पाणी शोधत शोधत पोलीस आयुक्तांनी शहराबाहेर जातात.

त्यांचा गोदा स्नानाचा दिनक्रमात एकाही दिवसाचा खंड नाही, मागील आठवड्यात गोदावरीला पूर आला तेव्हाही दीपक पांडे यांनी गोदा स्नान केले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे ते देशात प्रसिद्ध झाले होते.

या नदीचे पाणी रात्रभर स्थिर असते, चंद्राचा शीतल प्रकाश पडल्याने पित्ताचा नाश होतो, तर सूर्योदयवेळी नदीत स्नान केल्याने कफ, वात पित्त हे त्रिदोष मिटण्यास उपयोग होत असल्याचा आयुर्वेदाचार्य विक्रांत जाधव यांनी केला. नियुक्ती पासूनच दीपक पांडे चर्चेत आहेत, आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.