IPL विजेता कर्णधार ते मैदानावर पाणी घेऊन जाणारा वाॅटरबाॅय; भर मैदानात रडला डेव्हिड वाॅर्नर

मुंबई । देशात कोरोना असला तरी सध्या आयपीएलचा सिझन सुरू असून स्पर्धा आता रंगात आली आहे. असे असताना सनरायझर्स हैदराबाद टीममधून एक बातमी समोर येत आहे. खराब कामगिरीमुळे सनरायझर्सच्या फ्रँचायझीने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकले आहे.

त्यामुळे आता संघाची जबाबदारी केन विल्यमसनच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. त्यापेक्षा वॉर्नर सोबत वाईट घडले ते म्हाणजे राजस्थान विरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थानच मिळाले नाही.

आता त्याच्यावर अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. त्याला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतरही संघातही स्थान देण्यात आले नाही. यामुळे त्याचे चाहते खूप संतापले आहेत. या आधी वॉर्नरने या संघाला चॅम्पियन बनवले आहे.

२०२१ च्या आयपीएलमध्ये हैदराबाद संघाला सहा सामन्यांपैकी केवळ १ सामना जिंकता आला. आणि पाच वेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे, हैदराबाद आयपीएलच्या पॅईंट टेबलमध्ये सगळ्यात शेवटी आहे. यामुळे संघाने वॉर्नरसारख्या दिग्गज खेळाडूला कर्णधारपदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला.

यामुळे राजस्थानसोबच्या मॅचमध्ये खेळायला न मिळाल्याने तो भावूक झाला. त्याला त्याचे अश्रू आवरले नाही आणि तो मॅच दरम्यान रडू लागला. यामुळे त्याचे चाहते देखील नाराज झाले आहेत. ज्या टीमला विजेतेपद जिंकवून दिले, त्या टीममध्ये खेळायला न मिळणे हे किती वेदनादायी आहे, हे यानिमित्ताने दिसून आले.

हैदराबादने संघानेही डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात २०१६ चे आयपीएलमधील एकमेव विजेतेपद जिंकले होते. आणि आता त्याला संघाबाहेर राहावे लागत असल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये देखील त्याचे चाहते नाराज आहेत.

ताज्या बातम्या

म्हातारा झाला तरी रोमान्स करतो, लाज वाटत नाही का? लोकांनी झापल्यावर सलमान म्हणतो…

हृदयस्पर्शी! लेकीला दिलेला तो शब्द पूर्ण न करताच जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन; वाचून अश्रू होतील अनावर..

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर सावधान! इंकम टॅक्स डिपार्टमेंट करेल जप्त, वाचा नियम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.