क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! महाराष्ट्रातच रंगणार आयपीएलच्या सर्व लढती, ‘या’ पाच स्टेडियमची निवड

मुंबई | आयपील स्पर्धेच्या १४ व्या हंगामाची सुरुवात एप्रिल महिन्यात होणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा कुठे खेळवली जाणार असा सवाल क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. गेल्या वर्षीच्या हंगामातील आयपीएल समाने युएईत खेळले गेले होते. पण आता यंदाचे आयपीएल सामने भारतात आणि खास म्हणजे फक्त महाराष्ट्रात होणार असल्याचे समोर आले आहे.

कोरोना काळात क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन करताना विशेष गोष्टींचा विचार केला जात आहे. यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच सर्व सामन्यांची आखणी केली जात आहे. सामना खेळणाऱ्या खेळाडूंच्या निवडीसोबत सामन्याचे शहर, मैदान आणि महत्वाचे म्हणजे त्याठिकाणची कोरोनाची परिस्थिती याचा अभ्यासपुर्ण विचार केला जात आहे. तर युएई हा शेवटचा पर्याय असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान कोरोनामुळे बीसीसीआय एकाच राज्यात सर्व सामने खेळवण्याचा विचार करत असल्याचे समजते आहे. महाराष्ट्र हे राज्य निवडण्यामागे अनेक कारणं आहेत. यामध्ये महाराष्ट्रात फार कमी अंतरामध्ये बरेच स्टेडियम्स आहेत.

आयपीएलच्या १४ मोसमातील साखळी फेरीतील सामने मुंबई आणि शहराच्या शेजारील वानखेडे स्टेडियम, बेब्रॉन स्टेडियम, डी वाय पाटील स्टेडियम, रिलायन्स स्टेडियम तर पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. साखळी फेरेतील सामने महाराष्ट्र तर बाद फेरीतील सामने अहमदाबाद येथे होऊ शकतात. तर आपीएलचा अंतिम सामनाही अहमदाबादच्या मैदानावर होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या कमाईमध्ये धोनीच किंग! आतापर्यंत कमावलेत कोट्यवधी रुपये, जाणून घ्या..
विराटच्या ऐवजी अजिंक्य रहाणे कसोटी कर्णधार? अजिंक्य स्वत:च स्पष्ट म्हणाला..
भर मैदानात विराटची सटकली! पृथ्वी शॉला दिली शिवी; काय घडलं नेमकं
कन्यारत्न प्राप्तीनंतर अशी झाली अनुष्काची अवस्था; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.