मी अक्षयकुमारसारखी पैशांसाठी पगडी घालत नाही; पंजाबच्या स्टार क्रिकेटरचा अक्षयला टोला

सध्या आयपीएलचा हंगाम जोरात सुरू आहे. अनेक नवोदित खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सगळ्यांना चकीत केले आहे. त्यातीलच पंजाबचा एक खेळाडू हरप्रीत ब्रारने अभिनेता अक्षय कुमारशी पंगा घेतला आहे.

त्याने अक्षय कुमारला चपराक लावली आहे. तो म्हणाला आहे की, मी पैशांसाठी पगडी घालत नाही. असे म्हणताना त्याने आय सपोर्ट फार्मर्स असा हॅशटॅगही वापरला आहे. हरप्रीतने आयपीएल २०२१ च्या हंगामात बंगलोरसोबतच्या सामन्यात तुफान फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती.

त्यामुळे तो आता आयपीएलमधील एक स्टार खेळाडू बनला आहे. इंस्टाग्रामवरही त्याचे अनेक चाहते वाढले आहेत. एका युजरने त्याला कंमेंट केली होती की तु सिंग इज ब्लिंग चित्रपटातील अक्षय कुमारसारखा दिसतो.

त्यावर उत्तर देताना त्याने थेट अक्षय कुमारला चपराक लावली. तो म्हणाला की, मी अक्षय कुमारसारखी पैशांसाठी पगडी घालत नाही. हरप्रीतने अक्षय कुमारच्या शेतकरी आंदोलनातील भूमिकेला लक्ष्य केले आहे. त्याचे म्हणणे आहे की अक्षय कुमार पैशांसाठी पगडी घालतो.

तसेच त्याने त्या कमेंटच्या स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्याच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. २५ एप्रिलला त्याने हे ट्वीट केले होते. अक्षय कुमारचे चाहते त्याच्यावर संतापले आहेत.

दरम्यान, हरप्रीत ब्रारच्या दमदरा अष्टपैलु खेळीनंतर पंजाबने रॉयल चॅलेंजर्सचा पराभव केला होता. त्यानंतर रातोरात हरप्रीत स्टार खेळाडू बनला आहे. त्याच्या सोशल मिडीयावर वारंवार तो स्वता पगडी घालण्याबाबत अभिमान बाळगताना दिसतो. त्याने याआधीही पंजाबमधील अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या
दयाबेनला पागल औरत म्हटल्यावर जेठालाल अडकले वादाच्या भोवऱ्यात, वाचा पुर्ण किस्सा
चाहत्याने केले होते मीनाक्षी शेषाद्रीला जबरदस्ती किस; त्यानंतर मीनाक्षीने जे केले वाचून धक्का बसेल
आसाममध्ये भाजपकडून काँग्रेस भूईसपाट; सलग दुसऱ्यांदा भाजपने केली सत्ता काबीज
अर्जुन कपूरने सांगितले आई वडिलांच्या घटस्फोटाचे दुःख; म्हणाला, सोळाव्या वर्षी १५० वजन झाले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.