Share

IPL मध्ये लसिथ मलिंगाची पुन्हा दमदार एन्ट्री, ‘या’ संघाकडून उचलणार महत्वाची जबाबदारी

lasith-malinga.j

श्रीलंकेचा माजी दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये(IPL) नवी इनिंग सुरू करणार आहे. राजस्थान रॉयल्स(Rajasthan Royals) संघाने आगामी सिझनसाठी लसिथ मलिंगाला आपल्या संघात सामील करण्याची घोषणा केली आहे. राजस्थान रॉयल्सने लसिथ मलिंगाची गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे लसिथ मलिंगा आता राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देणार आहे.(ipl- lasitha malinga new bowling coach of rajastahn royals team)

२६ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) नवीन हंगामाची सुरवात होत आहे. या हंगामात श्रीलंकेचा माजी दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा राजस्थान रॉयल्स संघाच्या जर्सीत दिसणार आहे. याशिवाय, राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी पॅडी अप्टनला संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील करण्याची घोषणा केली आहे.

वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने श्रीलंकेसाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ३४० सामन्यांत ५४६ विकेट घेतले आहेत. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा राजस्थान रॉयल्सच्या युवा गोलंदाजांना फायदा होईल. वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये सुरु केलेल्या नवी इनिंगबद्दल म्हणाला की,”आयपीएलमध्ये परतणे ही खूप चांगली भावना आहे आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामील होणे ही सन्मानाची गोष्ट आहे.”

https://twitter.com/rajasthanroyals/status/1502200151334522884?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1502200151334522884%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Ftimesofindia.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fipl%2Ftop-stories%2Flasith-malinga-joins-rajasthan-royals-as-fast-bowling-coach%2Farticleshow%2F90149684.cms

आयपीएलमध्ये पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३८ वर्षीय मलिंगाने या टी-२० लीगमध्ये १२२ सामन्यांमध्ये १७० विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. गेल्या वर्षीप्रमाणे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

श्रीलंका संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गोलंदाजी सल्लागार म्हणून लसिथ मलिंगाचा संघात समावेश करण्यात आला होता. पण श्रीलंकेच्या संघाला ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करता आली नाही. श्रीलंका संघाला या मालिकेत १-४ अशा मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. लसिथ मलिंगा वनडे क्रिकेटमध्ये तीन वेळा हॅट्ट्रिक घेतली आहे. ही कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

लसिथ मलिंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेने २०१४ साली टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. लसिथ मलिंगाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत. मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागोपाठ ४ बॉलला ४ विकेट्स घेतल्या आहेत आणि असे त्याने दोन वेळा केले आहे. मलिंगा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या :-
शेतकऱ्याचा नाद नाय करायचा! फक्त २० गुंठ्यात घेतले ‘हे’ पिक अन् कमावले तब्बल सात लाख रूपये
पुन्हा रोहित शेट्टी दाखवणार एका कर्तबगार पोलिसाची कहाणी, जबरदस्त ऍक्शनमध्ये दिसणार ‘हा’ हिरो
पुढचं पाऊल’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला झालाय भयंकर आजार, शरीरातील अवयव जखडतायत

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now