मोठी बातमी! आयपीएल पुन्हा होणार, वर्ल्डकपबाबत लवकर निर्णय, बीसीसीआयची मोठी घोषणा

नवी दिल्ली । कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाची आयपीएल रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. यामध्ये काही सामने खेळले गेले होते. मात्र काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आणि आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यामुळे क्रिकेटप्रेमीमध्ये नाराजी होती, मात्र आता आयपीएलबाबत एक महत्त्वाची आणि क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. उर्वरित आयपीएल स्पर्धा पुन्हा घेतली जाणार आहे. याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माहिती दिली.

उर्वरित सर्व सामने संयुक्त अरब अमीरात यूएईत खेळवले जाणार आहेत. यामुळे आयपीएल पुन्हा होणार आहे. यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा आयपीएलचा थरार अनुभवायास मिळणार आहे.

सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हे सामने खेळवले जाणार आहेत. तसेच बीसीसीआय आयसीसीकडून १ महिन्यांचा कालावधी घेईल आणि भारतातील साथीच्या परिस्थितीचा अभ्यास करेल आणि त्यानंतर भारत किंवा युएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेईल.

यामुळे टी 20 विश्वचषक देखील होण्याची शक्यता आहे. कोरोनाची परिस्थिती बघून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरण्याच्या मार्गावर आहे. तिसरी लाट येणार या याबाबत सर्व गणित अवलंबून आहे.

आयपीएलचे निम्मे सामने खेळवले गेले आहेत. भारतात काही निवडक शहरात हे सामने खेळवले गेले. मात्र चेन्नईच्या काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे खबरदारी म्हणून स्पर्धा रद्द करण्यात आली.

मात्र आता आयपीएल आणि टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. क्रिकेट प्रेमींनी याबाबत आंनद व्यक्त केला आहे. मात्र पुढील निर्णय हा त्यावेळची कोरोनाची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाणार आहे.

ताज्या बातम्या

सुशांतच्या पुण्यतिथी आधी या अभिनेत्याने केले त्याच्या चाहत्यांचे कौतुक, म्हणाला सुशांतने हे कमवलं होतं

भारताला घाबरला पाकीस्तान! आता भारताच्या ‘या’ गोष्टीमुळे पाकीस्तानला भरली धडकी

होय हे खरं आहे! ‘बाहुबली’तील माहिष्मती काल्पनिक नाहीच, वाचा कुठे आहे हे अनोख राज्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.