आयपीएल रद्द होण्याची दाट शक्यता; कोरोनामुळे आजचा सामना रद्द

सध्या कोरोनाने संपूर्ण देशात हाहाकार उडवला आहे. देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, तरी देखील बायोबबलचे नियम राखत आयपीएलचा स्पर्धा सुरु आहे, अनेक परदेशी खेळाडूंनी कोरोनामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.

असे असताना एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, कोलकाता नाईट राईडर्स संघाकडून खेळणाऱ्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर यांना कोरोनाची लागण झाल्याते वृत्त ANI ने दिले आहे, आयपीएलने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. यामुळे आजचा होणारा सामना रद्द करण्यात आला आहे.

यामुळे आज आय़पीएलचा होणारा कोलकाता नाईट राईट रायडर्स विरुध्द बंगलोर चॅलेंजर्स हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे इथून पुढच्या काळात आय़पीएलचे खेळाडू जर कोरोना पॉझिटिव्ह आले तर यंदाचे आय़पीएल रद्द होण्याच्या शक्यता देखील अनेकांनी वर्तवली आहे.

आयपीएलच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल. यापूर्वी दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मॅच कोरोनामुळे रद्द झाली होती. आत कोरोनाने आयपीएलमध्ये देखील शिरकाव केला आहे.

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीपासून वेगवेगळ्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल, दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल, कोलकाता नाईट रायडर्सचा नितिश राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे हे खेळाडू काहीकाळ आयसोलेशनमध्ये होते.

त्यांचा आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर ते पुन्हा एकदा टीममध्ये दाखल झाले. आता मात्र हा सामना रद्द करण्यात आल्याने स्पर्धा होणार की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ताज्या बातम्या

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चहात मिसळा ‘हे’ दोन पदार्थ; होतील आश्चर्यकारक फायदे

बॉलीवूडच्या अभिनेत्रीच नाही तर ‘या’ अभिनेत्यांनी देखील केला आहे रंगभेदाचा सामना

बंगालमध्ये भाजप हारली, मात्र या महिला आमदाराची देशात होतेय चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.