काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्स संघाने पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. (ipl 2022 final match fixing sanju samson)
यानंतर काही चाहत्यांनी आयपीएलचा सामना फिक्स असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी यासंदर्भात ट्विट देखील केले आहेत. रविवारी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
पण हा निर्णय राजस्थान रॉयल्स संघासाठी योग्य ठरला नाही. कारण राजस्थान रॉयल्स संघाला २० षटकात केवळ १३० धावा करता आल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने १३० धावांचे लक्ष ७ विकेट राखून सहज गाठले. सोशल मीडिया युजर्सनी संजू सॅमसनच्या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“गुजरात टायटन्स संघाने धावांचा पाठलाग करताना एकतर्फी सामने जिंकले आहेत. हे संजू सॅमसनला माहित होते. तरीही त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया काही युजर्सनी सोशल मीडियावर दिली आहे. अनेक युजर्सनी हा सामना फिक्स असल्याचे सांगितले आहे. तसे तर्क देखील युजर्सकडून मांडण्यात येत आहेत.आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या आहेत. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत ३ विकेट घेतल्या. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने १३० धावांचे लक्ष दिले होते. गुजरात टायटन्स संघाकडून शुभमन गिलने सर्वाधिक ४५ धावा केल्या.
https://twitter.com/jawedkh69091856/status/1530992540006031361?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530992540006031361%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fsports%2Fipl-2022-final-rajsthan-royals-vs-gujrat-titens-match-were-fixed-fans-trolled-rr%2F627349
आयपीएल २०२२ चा विजेता संघ गुजरात टायटन्सनला बक्षीस म्हणून २० कोटी रुपये मिळाले आहेत. तर उपविजेता असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला बक्षीस म्हणून १२.५ कोटी रुपये मिळाले आहेत. राजस्थान रॉयल्सचा खेळाडू जोस बटलर ऑरेंज कॅपचा विजेता ठरला आहे. त्याला बक्षीस म्हणून १० लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय राजस्थान रॉयल्सचा खेळाडू जोस बटलरला Most Valuable Player हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
https://twitter.com/Ahmed_hussain85/status/1530989643231297536?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530989643231297536%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fsports%2Fipl-2022-final-rajsthan-royals-vs-gujrat-titens-match-were-fixed-fans-trolled-rr%2F627349
महत्वाच्या बातम्या :-
नताशासोबतचा फोटो शेअर करत पांड्याने दिले मनाला भिडणारे कॅप्शन; म्हणाला, हे आपल्या मेहनतीचे..
आर्यन खानला क्लीन चीट मिळाल्यानंतर NCB प्रमुखांनी whats app चॅटबद्दल केले मोठे वक्तव्य, म्हणाले..
IPL चा खिताब जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने केला मोठा खुलासा, सांगितले विजयामागचे कारण, म्हणाला..