IPL मध्ये धमाकेदार कामगिरी करणारा हा खेळाडू म्हणतोय, अनन्या पांडेसोबत बीचवर जायचंय आणि..

आयपीएलच्या १४ व्या मोसमाला सुरूवात झाली आहे. आयपीएलमध्ये खेळाडू धडाकेबाज कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज चेतन सकारियाने वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्स विरूध्द खेळल्या गेलेल्या सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत.

पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर चेतनवर क्रिकेटप्रेमी कौतूकांचा वर्षाव करत आहेत. या सामन्यानंतर गोलंदाज चेतन सकारिया आणि गोलंदाज आकाश सिंह यांच्यामध्ये एक मुलाखत घेण्यात आली. यामध्ये आकाश सिंहने प्रश्न विचारला की बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्री सोबत डेटवर जाऊ इच्छित आहेस.

यावर चेतनने अभिनेत्री अनन्या पांडेसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजस्थान रॉयल्सने ट्विटर अकाऊंटवर मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. चेतन सकारिया म्हणाला की, अनन्या पांडे बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री आहे. तिच्यासोबत डेटला बीचवर जाण्याची इच्छा आहे.

राजस्थानचा गोलंदाज चेतन सकारियाने पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. पंजाब किंग्स विरूध्द मॅचमध्ये त्याने ४ ओव्हरमध्ये ३१ रन देवून ३ विकेट घेतल्या होत्या. चेतन सकारियाला १ करोड २० लाखामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने ताफ्यात सामील करून घेतले आहे.

चेतनने अथक मेहनत घेऊन आयपीएलमध्ये संधी मिळवली आहे. त्याच्या घरची परिस्थीती खूप हालाकीची होती. त्याचे वडिल टेम्पो चालवून घर खर्च भागवायचे.
महत्वाच्या बातम्या-
बिनधास्त करीना! सांगीतले चक्क बेडरूममधील ‘ते’ रहस्य, म्हणाली झोपताना मला..
LIC ची भन्नाट योजना माहितेय? पेन्शनतर मिळतेच, सोबत गुंतवलेले पैसेही मिळतात परत, जाणून घ्या..
राजकुमारचा अंदाज पाहून पागल झाल्या होत्या स्मिता पाटील; केला झोपून मेकअप करायचा हट्ट

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.