अजबंच! हा फोटो व्हायरल होताच आयफोन धारकांना ऍपल कंपनीने दिला धोक्याचा इशारा

सोशल मीडियावर रोज लाखो फोटो पोस्ट होत असतात. लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. आता सध्या असचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये आयफोन १२ या मोबाईलच्या मागे एक विशिष्ट प्रकारचा धातू चिपकलेला आहे.

हा फोटो एका व्यक्तीने पोस्ट केला असून, त्याने तिथल्या मातीमध्ये मॅग्नेट आहे आणि त्यामुळे ती माती माझ्या फोनला चिपकली आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आयफोनच्या स्पिकरमध्ये, कॅमेरामध्ये ऑप्टीकल इमेज स्टॅबेलाईजर्स आणि मॅगसेफमध्ये मॅग्नेट आहे. ऍपलच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियाच्या ताहो शहरातच्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयरन ऑक्साईड प्लस पाईराईट आणि मॅग्नाईट आहे, त्यामुळे ते आयफोनच्या मागे चिपकते.

आयफोनमध्ये मॅग्नेट असल्याने ते कोणत्याही मॅग्नेटीक वस्तुला आकर्षित करत असतात. तसेच आयफोन औद्योगिक क्षेत्रात असणारे चाकू आणि दुसऱ्या धातूंनाही आकर्षित करते.

तसेच रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की हा फोटो जरी आकर्षित वाटत असला, तरी युजर्सने असे प्रयोग आयफोनवर नाही केले पाहिजे. कारण त्यामुळे आयफोनचे नुकसान होऊ शकते. या फोटोमध्ये आयफोनची बॅक साईड दिसत आहे. त्यामध्ये ती माती आयफोनला चिटकलेली दिसत आहे.

तसेच फोटोमध्ये ती माती कॅमेराच्या चारही बाजूला चिटकलेली आहे. पण असे असतानाही ती माती आयफोनसाठी नुकसानदायक असू शकते. कॅमेरा लेन्सलाही या मातीचा धोका असू शकतो, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

जर ही माती आयफोनमध्ये गेली तर आयफोन खराब होऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्याकडे आयफोन १२ असेल, तर तुम्ही औद्यागिक क्षेत्रात जाताना आयफोनला कव्हर लावणे गरजेचे आहे, असेही ऍपल कंपनीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

परवीन बॉबीला भेटण्यासाठी आलेला विदेशी चाहता कसा बनला बॉलीवूडचा खलनायक? वाचा बॉब क्रिस्टोची कहानी
…म्हणून मनीषा कोईरालाने सुपरहिट चित्रपट ‘जुबेदा’ला दिला होता नकार
प्रसिध्द गायक अरिजीत सिंहवर कोसळला दु:खाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचं कोरोनानं निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.