नवी दिल्ली | सोनं खरेदी करणे हा भारतीय लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पण आजच्या घडीला सोन्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. गुंतवणुकदारांसाठी हा मोठा धक्का आहे. अशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोनं खरेदी करण्यासाठी खास ऑफर दिली आहे.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षात सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या दहाव्या सिरीजनुसार गुंतवणुकदार ११ ते १५ जानेवारीदरम्यान गुंतवणुक करु शकतात. १९ जानेवारी ही सेटलमेंटची शेवटची तारीख आहे. RBI ने ८ जानेवारीला यासंदर्भात घोषणा केली होती.
गुंतवणूकदार ऑनलाईन अर्ज आणि डिजीटल पेमेंटचा वापर करुन गुंतवणूक करत असेल तर ५० रुपये प्रति ग्रॅमपर्यंत सवलत मिळणार आहे. या दहाव्या सिरीजनुसार रिझर्व्ह बँकने एक ग्रॅम सोन्याची किंमत ५ हजार १०४ रुपये निश्चित केली आहे. तसेच डिजीटल पेमेंटच्या माध्यमातून ५० रुपये प्रतिग्रॅमपर्यत सवलत मिळणार आहे.
गुंतवणुकदारांना १० ग्रॅमसाठी ५०,५४० रुपये मोजावे लागतील. म्हणजे दहा ग्रॅमवर ५०० रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. या स्किम अंतर्गत एक ग्रॅम पासुन पाचशे ग्रॅम पर्यत सोनं खरेदी करता येते. गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्समध्ये सवलत मिळेल. तसेच सरकारकडून दरवर्षी २.५ टक्के व्याज मिळते. ज्याप्रमाणात सोन्याचे भाव वाढतील त्याप्रमाणात व्याज मिळते. एका आर्थिक वर्षात ४ किलो पर्यंत गोल्ड बॉन्ड खरेदी करता येतील.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड म्हणजे नक्की काय?
या योजनेची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली. यामध्ये खरेदीदारांना फिजिकल गोल्ड ऐवजी डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करता यावी यासाठी ही योजना आणली. यामध्ये गुंतवणूक केल्यास गोल्ड बॉन्ड सर्टिफिकेट दिले जाते. तसेच मॅच्योरीटी पुर्ण झाल्यानंतर गुंतवणुदाराला सोन्याच्या दराप्रमाणे पैसे मिळतात.
महत्वाच्या बातम्या-
रोज फक्त ८० रूपये भरा आणि महीना २८ हजार रूपये पेन्शन मिळवा! LIC ची भन्नाट योजना
दरमहा २५०० रूपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील २ लाख रूपये; वाचा कसे…
सोन्यात गुंतवणूक काराचीय? अशा प्रकारे सोन्यात गुंतवणूक करा दरवर्षी होईल बक्कळ फायदा
चाळीशीनंतर अशी करा गुंतवणूक आणि कमवा दोन कोटी रुपये