अवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’ कोटींचे मालक, जाणून घ्या, तरुणांची प्रेरणादायी कथा

नागपूर । जगात काहीच अशक्य नसते, जर तुमच्यात करण्याची जिद्द आणि मेहनत असेल, तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात. आताच्या आधुनिक तंत्रज्ञान विकसित असल्याने ग्रामीण भागातील माणसे किंवा शहरी भागातील लोक असे भेदभाव आता राहिलेले नाही. मेहनतीच्या जोरावर कोणीही कुठेही आपले स्वप्न पूर्ण करण्यास सक्षम झालेले आहेत.

याचेच एक उदाहरण म्हणजे खानगाव (ता. काटोल) येथील पंकज कुमेरिया व नितीन बऱ्हैया या वैदर्भीय युवकांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. केवळ बारावीपर्यंत शिकलेल्या पंचविशीतील तरुणांनी अवघ्या चार-पाच वर्षांत साहसी क्रीडा साहित्य निर्मितीचा व्यवसाय देशभर पसरवत १५ हजारांवरून १८ कोटींपर्यंत विकसित केला आहे.

पंकज कुमेरिया व नितीन बऱ्हैया हे शेतकरीपूत्र एकाच गावचे. जि. प. शाळेत शिकले. केवळ बारावी पास. कामापुरते शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या भानगडीत न पडता काहीतरी वेगळे करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. घरच्यांनीही त्यांना पूर्ण सहकार्य केला. जुनेवानी येथे ‘ॲडव्हेंचर कॅम्प’ चालविणारे शिक्षक भुदेव बहुरूपी यांनी मार्गदर्शन केले.

त्यानंतर दोघेही घराबाहेर पडले. सुरुवातीला इंटरनेटवर सर्च करून विविध व्यवसायांबद्दलची माहिती गोळा केली. सर्व अभ्यास व विचार केला. आवडीच्या ‘ॲडव्हेंचर’ क्षेत्रात पुढे जाण्याचे त्यांनी ठरविले. जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये गुंतवून सप्टेंबर २०१५ मध्ये ‘नेल इंडिया ॲडव्हेंचर प्रा. लि.’ ही कंपनी स्थापन केली.

हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला, तसे कार्य विस्तारत गेले आणि उत्पन्नातही हळूहळू वाढ होत गेली. काटोलामधून उद्योगाचा पाया घट्ट रोवल्यानंतर त्यांनी विस्तारवादाचे धोरण स्वीकारले. २०१८ मध्ये त्यांनी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे कारखाना सुरू केला. त्याचवेळी काटोलमधील कारखाना अन्य मित्रांच्या स्वाधीन केला आणि त्यांनाही कामात गुंतविले.

पंकज व त्याच्या मित्राच्या कारखान्यात ‘ॲडव्हेंचर पार्क’मध्ये लागणाऱ्या साहसी क्रीडा साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. हवेत चालणाऱ्या सायकलपासून ते रॉकेट इंजेक्शनपर्यंत आणि स्काय रोलर ते रोलर कोस्टरपर्यंत असंख्य दर्जेदार ‘ॲडव्हेंचर प्रॉडक्ट्स’ची निर्मिती सुरू केली.

भारतात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्यांची निर्मिती कुठेही होत नाही. कल्पनाशक्तीच्या जोरावर नवनवीन साहित्य तयार करून देशभर विकले. आजच्या घडीला भारतात कंपनीच्या शंभरांवर साइट्स आहेत. दुबई व युगांडासारख्या देशातही साहित्यांची निर्यात केली.

त्यामुळेच १५ हजारांत सुरू केलेला हा व्यवसाय १८ कोटींच्या घरात पोहोचू शकला. कंपनीत तज्ज्ञांची प्रॉडक्शन, रिसर्च, इंस्टॉलेशन व मार्केटिंग टीम आहे. त्यांच्या भरवशावरच एवढे साम्राज्य उभे करू शकल्याचे पंकज सांगतो. या तरुणांनी हे दाखवून दिले की, आपल्यात करण्याची जिद्द आणि मेहनत असेल तर सगळे स्वप्न पूर्ण होतात.

ताज्या बातम्या

पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड अडचणीत?, पोलिसांच्या हाती लागला ‘हा’ महत्वाचा पुरावा

आयुष्याची नव्याने सुरुवात करणार मंदिरा बेदी; पतीच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली…

शाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना? जाणून घ्या ‘या’ पदार्थांमध्ये आहे मांसाहारी घटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.